इचलकरंजी : शहर व परिसरातील वस्त्रोद्योगातील ‘टॉप २४’ सहकारी संस्थांकडे राष्ट्रीय सहकारी विकास निगम व शासकीय भागभांडवलाची २०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकीत रकमेच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबवून सक्तीने वसुली करण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग उपसंचालक किरण सोनवणे यांनी पत्रकारांना दिली.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत नोंदणी झालेल्या वस्त्रोद्योग सहकारी संस्थांकडे राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) व शासकीय भागभांडवलाची एकूण ६३५.७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे, असे सांगून उपसंचालक सोनवणे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात २६२ वस्त्रोद्योग सहकारी संस्था आहेत. त्यापैकी इचलकरंजी शहर व परिसरात संस्थांची संख्या ९० टक्के आहे. ‘एनसीडीसी’कडून संस्थांना दिलेल्या भांडवलासाठी शासनाची हमी आहे. मात्र, त्याची वेळेवर परतफेड होत नाही, असे निदर्शनास आले आहे. तसेच काही संस्थांनी शासकीय भागभांडवलसुद्धा परत दिलेले नाही, अशा प्रकारे संस्थांकडे २०० कोटी ६१ हजार रुपये थकीत आहेत.थकबाकी असलेल्या टॉप २४ संस्था पुढीलप्रमाणे असून, त्यांच्याकडे असलेली रक्कम संस्थानिहाय अशी आहे - महालक्ष्मी प्रोसेसर्स (२१ कोटी ५८ लाख), श्रीपंत प्रोसेसर्स (१३ कोटी ४९ लाख), श्रीपंत पॉवरलूम सोसायटी (२ कोटी २ लाख), इचलकरंजी को-आॅप. सोसायटी (१४ कोटी १८ लाख), डेक्कन प्रोसेसर्स (१६ कोटी ७७ लाख), यशवंत प्रोसेसर्स (१४ कोटी ८२ लाख), बाहुबली प्रोसेसर्स (११ कोटी ९५ लाख ७४ हजार), विवेकानंद को-आॅप. टेक्स्टाईल (९ कोटी ८७ लाख), ग्लोबल पॉवरलूम (९ कोटी ७० लाख), छाया पॉवरलूम (८ कोटी ८९ लाख), लक्ष्मी को-आॅप. प्रोसेसर्स (८६ लाख ३१ हजार), मारुती पॉवरलूम (१० कोटी ५२ लाख ५१ हजार), नवरंग प्रोसेसर्स (६ कोटी ७७ लाख), युवा प्रगती आॅटोलूम (५ कोटी २६ लाख), वरदविनायक पॉवरलूम (५ कोटी १७ लाख), सुयश पॉवरलूम (५ कोटी १४ लाख ९१ हजार), चाणक्य पॉवरलूम (४ कोटी ६० लाख), सूर्योदय आॅटोलूम (४ कोटी ४५ लाख), राजवर्धन आॅटोलूम (४ कोटी ४४ लाख), धर्मराज आॅटोलूम (४ कोटी ३६ लाख), श्री पंचगंगा आॅटोलूम (४ कोटी ३१ लाख), महालक्ष्मी महिला आॅटोलूम (४ कोटी ३० लाख), नितीन आॅटोलूम (४ कोटी १६ लाख), वृषभ पॉवरलूम (४ कोटी ९ लाख) व ताराबाई मागासवर्गीय को-आॅप. प्रोसेसर्स (१० कोटी ८४ लाख रुपये). (प्रतिनिधी)‘त्या’ २४ संस्थांवर कडक कारवाईवस्त्रोद्योग उपसंचालक सोनवणे यांनी थकीत रक्कम भागविण्यासाठी मंगळवारी येथील पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात संस्थाचालकांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला ६२ पैकी फक्त ५० संस्थांचे प्रतिनिधीच उपस्थित राहिले, तर टॉप २४ पैकी ५ संस्थांचे प्रतिनिधी आले. या टॉप २४ संस्थांवर वसुलीची कडक कारवाई करणार असल्याचा इशारा उपसंचालकांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
थकबाकीसाठी वस्त्रोद्योग संस्थांवर वसुलीचा बडगा
By admin | Published: March 01, 2017 12:38 AM