शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Kolhapur: ग्रामपंचायतीच्या अपहारामधील १५ कोटींची वसुली थकली

By समीर देशपांडे | Published: November 16, 2023 2:19 PM

सर्वाधिक रक्कम कोणत्या तालुक्यात..जाणून घ्या

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील अपहाराची सुमारे १५ कोटी रुपयांची वसुली थकली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी आता याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा पातळीवरील विभागप्रमुख, गटविकास अधिकारी आणि तालुका पातळीवरील विभागप्रमुख यांची बैठक झाली. यामध्ये यावर सविस्तर चर्चा झाली.गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामपंचायतीमधील अपहाराच्या घटना वाढायला लागल्या आहेत. वित्त आयोगाच्या माध्यमातून लहान ग्रामपंचायतींना लाखो तर मोठ्या ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपये मिळू लागल्याने साहजिकच अपहाराची प्रकरणेही वाढीस लागली आहेत. अशातच पंचायत राज व्यवस्थेमधील चौकशी प्रक्रियाही कालबाह्य झाल्यामुळे ते कायदेच निष्प्रभ ठरले आहेत. त्यामुळेच या अपहारातील वसुलीची रक्कम थकत चालली आहे.ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये रस्ते, गटर्स, पाणीपुरवठा, वीजबत्ती ही प्रमुख कार्ये येतात. त्यात आता घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनही समाविष्ट झाले आहे. ग्रामसेवक आणि सरपंच यांचे नाते एकदा का घट्ट झाले की मग तेथे विरोधकसुद्धा काही करू शकत नाहीत, असे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रकरणांवरून दिसून आले आहे. त्याचमुळे कामे न करता पैसे अदा करणे, कमिशनवर साहित्य घेणे हे प्रकार सर्रास होत राहतात. परंतु अनेक बहाद्दरांनी वसूल झालेला करसुद्धा खिशातच घातलेली उदाहरणे आहेत. त्यामुळेच केंद्र शासनाने नवी ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गेल्या पाच वर्षांमधील २०७ अपहाराची प्रकरणे घडली. त्यामध्ये १८ कोटी ८० लाख ६३ हजार रुपयांचा अपहार झाला होता. त्यातील केवळ ३ कोटी ६९ लाख ७७ हजार रुपयांची वसुली झाली आहे. परंतु १५ कोटी १० लाख ८६ हजार रुपयांची अजूनही वसुली झालेली नाही.

सर्वाधिक रक्कम हातकणंगलेमध्येसर्वाधिक अपहार हा हातकणंगले तालुक्यात झाला असून त्यामुळे तेथील वसुलीही मोठ्या प्रमाणावर थकली आहे. एकट्या हातकणंगले तालुक्यातील ११ कोटी ४४ लाख रुपयांची अपहाराची वसूल रक्कम थकीत आहे. त्याखालोखाल कागल तालुक्याचा नंबर असून तेथील १ कोटी ४३ लाख रुपयांची वसुली थकली आहे. गडहिंग्लज, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील अपहारातील वसूल रक्कम शून्य आहे.

अपहाराच्या वसुलीची थकीत रक्कम रुपयेहातकणंगले - ११ कोटी ४४ लाखकागल - १ कोटी ४३ लाखकरवीर - १ कोटी १० लाखचंदगड - ४४ लाख ७० हजारआजरा - २१ लाख ५१ हजारशाहूवाडी - १८ लाख ६३ हजारशिरोळ - १४ लाख ६ हजारगगनबावडा - ८ लाख २८ हजारभुदरगड - ५ लाख ८३ हजारगडहिंग्लज - ००पन्हाळा - ००राधानगरी - ००

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत