इंदूमती गणेश ।कोल्हापूर : चित्रपटगृह, व्हिडिओ पार्लर, केबल, सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणाऱ्या करमणूक कर वसुलीला जीएसटीच्या अंमलबजावणीपासून ब्रेक लागला आहे. या करवसुलीसाठी वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने सर्वेक्षण सुरू असून, जुलैमध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा करमणूक कर विभाग महसूलकडे होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र विभाग कार्यरत असून, मनोरंजनाची साधने आणि झालेली वसुली यांची स्वतंत्र विभागणी केली आहे. या विभागाने गेल्या तीन वर्षांत शासनाकडून आलेल्या उद्दिष्ट्यापेक्षाही अधिक कराची वसुली केली आहे. मात्र, जुलै २०१७ पासून देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला. त्यात करमणुकीच्या साधनांचाही समावेश असल्याने हा विभाग ‘महसूल’कडून स्थानिक स्वराज्य संस्था व वस्तू व सेवा कर विभागाच्या अंतर्गत गेला. त्यामुळे करमणूक कराची स्वतंत्ररित्या होत असलेली वसुली थांबली.
महापालिका, जिल्हा परिषद, वस्तू व सेवा कर या तीन शासकीय कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात करमणूक कर भरला जातो. या कराची स्वतंत्र विभागणी केली नसल्याने गेल्या अकरा महिन्यांत नेमका किती कर वसूल झाला आहे याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे वस्तू व सेवा विक्रीकर विभागाच्यावतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी दोन अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. जूनअखेरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करून त्यानंतर वसुलीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
करमणूर कर जीएसटी अंतर्गत आल्याने नेमका किती कर वसूल झाला आह,े याची स्वतंत्र माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या कार्यालयाकडून सर्वेक्षण सुरू असून, त्याचा अहवाल आल्यानंतर कर वसुलीसाठी मोहीम राबविली जाईल.-सचिन जोशी (उपायुक्त जीएसटी विभाग)महसूल विभागाने वसूल केलेला करमणूक करसन २०१५-१६ : १० कोटी ६० लाखसन २०१६-१७ : १२ कोटी २३ लाखसन २०१७-१८ : ४ कोटी २६ लाख (एप्रिल, मे, जूनपर्यंत)