शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

लाल निशाण अस्तित्व राखणार की अस्ताला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:24 AM

पोपट पवार तिरुवनंतपुरम : कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गाचा आवाज बनून ज्यांनी पश्चिम बंगालसह त्रिपुरा, केरळ या राज्यांमध्ये तीन दशकांहून ...

पोपट पवार

तिरुवनंतपुरम : कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गाचा आवाज बनून ज्यांनी पश्चिम बंगालसह त्रिपुरा, केरळ या राज्यांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ एकहाती सत्तेचे नाणे खणखणीत वाजवून दाखविले ते डावे पक्ष सध्या देशातील राजकीय पटलावर आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. बंगाल आणि त्रिपुरातील एकहाती सत्तेची कमान हातातून निसटल्यानंतर उरल्यासुरल्या केरळच्या मैदानावर लाल निशाण फडकवत ठेवण्यासाठी डाव्या पक्षांनी आपले अस्तित्व पणाला लावले असले तरी कधीकाळी प्रबळ संघटन आणि जनाधाराचे वैभव लाभलेले हे लाल निशाण आपले अस्तित्व राखणार की, देशाच्या राजकीय पटलावरून अस्ताला जाणार याचा फैसलाच केरळच्या मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये सत्तेसाठी ज्यांच्याबरोबर टोकाचा संघर्ष सुरू आहे, त्याच काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालमध्ये मात्र गळ्यात गळे घालण्याची वेळ डाव्यांवर आली आहे. पश्चिम बंगालच्या सिंहासनावर साडेतीन दशकांहून अधिक काळ डाव्या पक्षांनी आपली मांड शाबूत ठेवली होती. शेतकरी आणि कामगारांचा तारणहार म्हणून या पक्षाची प्रतिमा तळागाळापर्यंत पोहोचली. मात्र, सिंगूर आणि नंदीग्राममधील प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूसंपादनावेळी डाव्यांनी भांडवलदारांची तळी उचलल्याने लाल झेंड्याखाली एकवटलेला वंचित वर्ग तृणमूल काँग्रेसच्या आश्रयाला गेला, परिणामी डाव्यांचा बालेकिल्ला पत्त्यासारखा कोसळला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही डाव्यांना दुहेरी आकडा गाठतानाही नाकीनऊ आले होते. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांना अवघ्या ३२ जागांवर विजय मिळविता आला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र एकही जागा त्यांच्या पदरात पडली नाही. विधानसभा निवडणुकीत २५ टक्के मते घेतलेल्या डाव्यांना लोकसभा निवडणुकीत १० टक्केही मते घेता आली नाहीत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही डावे पक्ष काँग्रेसचा हात हातात घेऊन मैदानात उतरले असले तरी सत्तेच्या खिजगणतीतही ते नसल्याचे चित्र आहे. डाव्यांचा हक्काचा मतदार भाजपकडे आकृष्ट झाल्याने तिसऱ्या-चौथ्या क्रमांकासाठी डावे झगडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे त्रिपुरामध्ये माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांनी २५ वर्षे सत्तेचा एकछत्री अंमल ठेवला खरा. मात्र, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्षासह डाव्यांचा हाही गड काबीज केला. केरळमध्ये मात्र आलटून-पालटून सत्तेची कमान हातात ठेवत डाव्यांनी कसेबसे या एकमेव राज्यात अस्तित्व टिकवून ठेवले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही डावे पुरत्या ताकतीनिशी रिंगणात आहेत. काँग्रेसच्या सुंदोपसुंदीचा लाभ उठवीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून ते विक्रम करण्याची तयारी करीत असले तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २० पैकी अवघी एक जागा नावावर असलेले डावे केरळच्या भूमीत आपले लाल निशाण टिकवून ठेवण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.