उत्तूर : झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडण्याचा कालावधी कमी करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांच्याकडे निवेदनातून भारतीय किसान संघाने केली आहे.निवेदनात म्हटले आहे, प्रकल्पात केवळ ६१ टक्के पाणीसाठा आहे. एकूण २८ बंधाऱ्यांपैकी १ ते १७ क्रमांकाचे बंधारे व १८ ते २८ क्रमांकाचे बंधारे उतार जास्त असल्याने बंधाऱ्यात जलसाठा कमी होऊन त्याचा उपसा सुरू झाल्यावर प्रकल्पातील साठा कमी होऊन प्रकल्प कोरडा पडतो.नदीपात्र अरुंद असून, वाढलेले वृक्ष व झुडपे तोडावीत त्यामुळे जलसाठ्यात वाढ होईल. उपसा चालू केल्यानंतर पुढचा कालावधी येईपर्यंत पीक करपून जातात. यासाठी कालावधी कमी करावा. शेतीचे पाणी उद्योगधंद्यांना देऊ नये. उपसाबंदी सात दिवसांचा करावा व उपसा चालू सात दिवसांचा करावा, यामुळे पिकांना धोका पोहोचू शकत नाहीत. निवेदनावर मदन देशपांडे, आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
चिकोत्रा प्रकल्पातील उपसाबंदी कमी करा
By admin | Published: November 17, 2016 11:46 PM