या वेळी बोलताना एकनाथ पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिबेट पात्र किफायतशीर कर्ज व्याजदर १ जून २०२१ पासून कमी करण्याचा संचालक मंडळाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला आहे. यात सोने तारणावर १२.५० टक्के असणारा व्याजाचा दर १० टक्के करण्यात आला आहे. नवीन घर बांधणी अथवा प्लॅट खरेदी व्याज १२.५० टक्के वरून ते १०.५० टक्के कमी करण्यात आले आहे. स्थावर तारण कर्ज सोळा टक्केवरून कमी करून १२ टक्के तर वाहन कर्ज १२ टक्केवरून कमी करून १०.५० टक्के करण्यात आले आहे. नवीन मशिनरी कर्ज १४ टक्केऐवजी १२ टक्के तर, कॅश क्रेडिट १५ टक्केवरून कमी करून १३ टक्के करण्यात आले आहे. याचा सर्व कर्जदारांना फायदा होणार असल्याचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सांगितले आहे.
या वेळी उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर, संचालक भगवान सूर्यवंशी, सुभाष पाटील, निवास पाटील, उत्तम पाटील, आनंदराव पाटील, निवास पाटील, दादासो पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, संभाजी नंदिवाले, कार्यकारी संचालक भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते.