कोल्हापूर : प्रोसेनियम आर्ट असोसिएशनतर्फे ह्यअंक दुसराझ्र कोरोनानंतरचा नाट्यप्रवासह्ण हे ऑनलाईन चर्चासत्र रविवारी (दि. ५) घेण्यात आले. त्यात विविध रंगकर्मी सहभागी झाले. या चर्चासत्रात अभिनेते हृषिकेश जोशी यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये एक कलाकार म्हणून आपण स्वतःवर किती काम केले? असा प्रश्न उपस्थित करून प्रत्येकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले. अभिनेते अभिराम भडकमकर यांनी लॉकडाऊननंतरच्या काळातील नाट्यप्रवासाला साथोत्तरीय नाटक असा उल्लेख करीत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात नाट्यकला जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.
नाट्यदिगदर्शक अनिरुद्ध खुटवड यांनी नाट्यप्रकार सादरीकरणासाठी विविध उपलब्ध थिएटर स्पेसचा रंगमंच म्हणून कसा वापर केला जाऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले. नाट्यनिर्माते संतोष काणेकर यांनी नाट्यनिर्मिती प्रक्रिया सविस्तरपणे उलगडून सांगितली. लॉकडाऊननंतर नाट्यनिर्मिती प्रक्रियेसमोरील आव्हाने त्यांनी स्पष्ट केली.
या चर्चासत्रात शरद्चंद्र भुताडिया, प्रभाकर वर्तक, प्रसाद वनारसे, सागर तळाशीकर, विकास पाटील, सौमित्र पोटे, स्वप्निल राजशेखर, संजय मोहिते, आदींसह देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक रंगकर्मीं सहभागी झाले. या चर्चासत्राचे संयोजन प्रोसेनिअम संस्थेचे अध्यक्ष अवधूत जोशी, सलीम मुल्ला, श्रेयश मोहिते, सत्यजित साळोखे, शैलेश शिंदे यांनी केले.