शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गुरव यांच्या साहित्यात क्रांतिकारी विचारांचे प्रतिबिंब

By admin | Published: March 18, 2017 12:24 AM

सुशीलकुमार शिंदे : अनुराधा गुरव यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

कोल्हापूर : साहित्यातून विचारांच्या विविध रंगांची उधळण होत असते. असे रंग जेव्हा समाजातील वाचकमनाशी समरस होतात तेव्हा त्यातून विचारांची जडणघडण होत असते. वास्तवातील अनेक गोष्टींचे प्रतिबिंब साहित्यातून उमटवीत असताना साहित्यिकाला प्रवाहाच्या विरोधात जावे लागते. अशा विरोधी प्रवाहातसुद्धा जे टिकते ते खरे साहित्य असते. अनुराधा गुरव यांच्या साहित्यातही प्रवाहाविरोधी वाहणाऱ्या क्रांतिकारी विचारांचे प्रतिबिंब उमटते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी ज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार, प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी संपादित केलेल्या ‘अनुराधा गुरव : व्यक्ती आणि वाङ्मय’ या गौरव ग्रंथाचे तसेच गुरव यांनी लिहिलेल्या सहा ग्रंथांचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक चंद्रकुमार नलगे होते. यावेळी बाबा सावंत, पत्रकार विजय चोरमारे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील उपस्थित होते. शिंदे म्हणाले, साहित्य हे संस्कृती, समाजव्यवस्था, जीवनशैली यांचा आरसा असतो. ते माणसाला घडवीत असते. त्याच्या दृष्टिकोनातील एकांगीपणा काढून व्यापकपणे समाजाकडे पाहण्याची ऊर्जा साहित्यातून मिळते. त्यासाठी साहित्यिकांना नेहमीच्या वाटेपेक्षा प्रवाहाविरोधातील वाट चोखाळावी लागते.क्रांतिकारी विचारांची पेरणी करून ती समाजमनात रुजविणारे वेगळ्या धाटणीचे साहित्य परिवर्तनासाठी योगदान देते. अनुराधा गुरव यांच्याविषयी ते म्हणाले, आम्ही सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात एकत्र शिकत होतो. सोलापुरातील बाळेसारख्या ग्रामीण भागातून कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी पन्नास वर्षांपूर्वी साहित्याची आवड जपते आणि इतके मोठे स्थान मिळवते हे अभिमानास्पद आहे. त्यांची लेखनशैली सहज समजणारी, सोप्या भाषेची असल्याने सर्वसामान्य वाचकालाही तिची भुरळ पडते. अनुराधा गुरव म्हणाल्या, साहित्यात आज जे स्थान मिळविण्याचा प्रयत्न केला, त्याची प्रेरणा घरातून मिळालेल्या प्रोत्साहनातून, शिक्षकांनी केलेल्या कौतुकातून मिळाली. बाळेसारख्या छोट्या गावात निसर्गाच्या सान्निध्यात गेलेले बालपण आणि तारुण्य लेखनासाठी स्फूर्तिप्रद ठरलं. शब्दांच्या सोबतीने माझे पंचाहत्तर वर्षांचे आयुष्य सुकर केले आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे सेवक संघाचे नेते बाबा सावंत, गौरवग्रंथाचे संपादक प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण, ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरव यांच्या साहित्यावर पहिली तुलनात्मक पीएच. डी. पदवी प्राप्त करणारे डॉ. बाळासाहेब कामाण्णा यांचा सत्कार करण्यात आला. भीमराव धुळुबुळु यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विश्वनाथ भोसले यांनी शिंदे यांचा परिचय करून दिला. डॉ. आशिष गुरव यांनी स्वागत केले. प्रा. टी. के. सरगर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये शुक्रवारी साहित्यिका अनुराधा गुरव यांचा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला. यावेळी बाबा सावंत, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, पत्रकार विजय चोरमारे, लेखक चंद्रकुमार नलगे, प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण उपस्थित होते.