शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

यळगूडच्या शेतकरी संस्थेत सत्तांतर

By admin | Published: June 20, 2016 1:04 AM

सत्ताधाऱ्यांचे खाते रिकामे : गोठखिंडे, मोहिते गटाची बाजी

हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील शेतकरी सहकारी विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संस्थापक अण्णासाहेब गोठखिंडे व शेतकरी सहकारी संघाचे माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले. सत्ताधारी अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. जवाहर साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब गोठखिंडे यांनी २३ जून १९९९ ला संस्थेची स्थापना केली असून ३८९ सभासद मतदानास पात्र आहेत. रविवारी झालेल्या निवडणुकीत ९८टक्के मतदान झाले. २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान मोहिते व गोठखिंडे गटामध्ये ग्रामपंचायत सत्तेच्या कारणावरून वितुष्ट आल्यामुळे मोहिते गटाने त्यावेळी विरोधक असणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांना पाठिंबा देऊन सत्तांतर घडवून आणले होते. यावेळी मात्र मोहिते यांनी गोठखिंडे यांना सोबत घेत सत्ता परत मिळवून दिली आहे. मोहिते गट किंगमेकर ठरला आहे. पाटील गटाच्या उमेदवारांना मिळालेली मते अशी : विद्यमान चेअरमन अरुण घुणके (१३६), मारुती कदम (१२९), कुबेर डंके (१२७), रामगोंडा पाटील (१२८), शांतीनाथ पाटील (१२५), अरुण पांगरे (१२८), कृष्णात वाडकर (१२६), शहाजीराव शिंदे (१११). महिला गट - राजश्री काटकर (१३५), जयश्री चौगुले (१३२), तानाजी वड्ड (१३७), सुधीर कुर्ले (१२८), विलास चौधरी (१३२). गोठखिंडे व मोहिते गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी सर्वसाधारण गट - संस्थापक अण्णासाहेब गोठखिंडे (२०८), सुभाष गोठखिंडे (१९४), शामराव घुणके (१९५), बाळगोंडा पाटील (१९४), बापू माळी (१९८), जनार्दन लोले (१९६), भिकाजी शिंदे (१८९), राजाराम सलगर (१८७). महिला गट - शांताबाई आमत्ते (१९८), कस्तुरी हणबर (१९७), भटक्या विमुक्त जाती जमाती - सदाशिव वड्ड (२०२). इतर मागास वर्ग - आनंदा माळी (२११), मागासवर्गीय-यशवंत कांबळे (२०७).