बेळगाव महापालिकेसमोर काही विघ्नसंतोषी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या लाल-पिवळ्या ध्वजामुळे तेथील राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे. तेव्हा हा ध्वज तत्काळ हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच लाल-पिवळ्या ध्वजामुळे महापालिका आवारातील राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान, हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी यापूर्वी लोकशाही मार्गाने वारंवार केलेली मागणी, तसेच वादग्रस्त लाल-पिवळ्या ध्वजामुळे काही दिवसांपूर्वी निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती याची पुन्हा एकवार जिल्हाधिकाऱ्यांना माहिती करून दिली. त्याचप्रमाणे त्या लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात निर्णय घेण्यास विलंब होत असून आता लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्हाला ठोस पावले उचलावी लागतील, असा इशाराही समितीच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना दिला.
‘‘लाल-पिवळ्या’’संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली शनिवारपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:27 AM