शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘किसान सन्मान’साठी कोल्हापूर जिल्ह्यात ३७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:44 AM

कोल्हापूर : सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु ही ...

ठळक मुद्दे ‘किसान सन्मान’साठी कोल्हापूर जिल्ह्यात ३७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी जोपर्यंत वेबसाईट खुली तोपर्यंत नोंदणी सुरूच राहणार

कोल्हापूर : सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु ही प्रक्रिया थांबविण्यासाठी सरकारकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत, तसेच नोंदणीची वेबसाईट अद्याप खुलीच असल्याने नोंदणी प्रक्रिया सुरूच राहणार आहे. रविवारपर्यंत योजनेच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यात ३७ हजार ३१२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली.सरकारने या योजनेसाठीची पूर्वीची दोन हेक्टरची अट शिथील केली आहे. या नवीन धोरणानुसार रविवारपर्यंत जिल्ह्यात ३७ हजार ३१२ शेतकऱ्यांची आॅनलाईनद्वारे नोंदणी झाली आहे. अट शिथील करण्यापूर्वीची नोंदणी दोन लाख ९५ हजार ९७४ इतकी होती. त्यामध्ये या नवीन आकडेवारीची भर पडत आहे.

सरकारने या योजनेची नोंदणी जूनअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाकडून यंत्रणा गतिमान करून युद्धपातळीवर नोंदणीचे काम सुरू आहे. उद्दिष्टाप्रमाणे रविवारी शेवटचा दिवस असला, तरी अद्याप नोंदणीसाठी पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचे काम सुरू आहे. सरकारकडून नोंदणीसाठीची वेबसाईट रविवारी रात्रीपर्यंत बंद करण्यात आली नव्हती; त्यामुळे जोपर्यंत ही वेबसाईट खुली आहे, तोपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

‘किसान सन्मान’ची नोंदणीतालुका      शेतकरी नोंदणी

  1. आजरा              १५१८
  2. गगनबावडा        ७७४
  3. भुदरगड             १६०३
  4. चंदगड               २७३१
  5. गडहिंग्लज         ३४९६
  6. हातकणंगले       ६७००
  7. कागल               २०३४
  8. करवीर              ५५७९
  9. पन्हाळा            ४२५१
  10. राधानगरी        २१९३
  11. शाहूवाडी          ३५९४
  12. शिरोळ            २८३९एकूण           ३७,३१२

 

‘किसान सन्मान’च्या नोंदणीसाठी सरकारने ३० जूनपर्यंतचे उद्दिष्ट दिले होते; परंतु ही नोंदणी थांबविण्याबाबत कोणतेही निर्देश सरकारने दिलेले नाहीत. तसेच नोंदणीची वेबसाईटही अद्याप खुली आहे; त्यामुळे पुढील निर्देश येईपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरूच राहील.- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर