शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

Kolhapur News: बोगस बांधकाम कामगारांना दणका, नोंदणी रद्द होणार; कॅगच्या तपासणीनंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 1:14 PM

ग्रामसेवकांकडूनही दाखला देण्यास नकार

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात मोठ्या संख्येने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची चौकशी कॅगकडून (महालेखापरीक्षक) गेल्या महिन्यात झाल्यानंतर आता बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी रद्दची प्रक्रिया कामगार कार्यालयातून सुरू झाली आहे. तुमच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यामुळे नोंदणी रद्द करण्यात येत आहे, असा संदेश बोगस बांधकाम कामगारांना येत आहेत. दरम्यान, तपासणीत किती बांधकाम कामगार बोगस आढळून आले, यासंबंधीची गोपनीयता शासकीय यंत्रणेतर्फे ठेवण्यात आली आहे.गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झाली. त्यांनी राज्य, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतला. यामुळे गेल्या महिन्यात कॅगच्या पथकाने अधिक संख्येने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची चौकशी केली. चौकशीत बांधकाम कामगारांनी ग्रामसेवक, अभियंत्यांनी दिलेल्या दाखल्यांची छाननी करण्यात आली. छाननीत अभियंत्यांनी दिलेल्या दाखल्यावर कॅगने आक्षेप नोंदवले.

परिणामी एकाच अभियंत्याने बहुसंख्य दाखले दिलेल्या बांधकाम कामगारांची नोंदणी धोक्यात आली आहे. त्यांना तुम्ही जोडलेला दाखला नोंदणीकृत शासनमान्य अभियंत्यांकडून घेतलेला नाही. अर्जात त्रुटी राहिल्या आहेत. यामुळे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी रद्द होत आहे, असा संदेश अनेक बांधकाम कामगारांना येत आहेत. यामुळे बांधकाम कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.ग्रामसेवकांकडूनही दाखला देण्यास नकारबांधकाम कामगार नोंदणीतील बोगसगिरी उघड झाल्यानंतर अनेक गावांतील ग्रामसेवक ताकही फुंकून पित आहेत. ते खरोखर बांधकाम कामगार असलेल्यांनाही दाखला देण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर