शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

मुश्रीफांना विरोधी पक्षनेता न झाल्याचे दु:ख

By admin | Published: September 20, 2015 1:26 AM

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी साधला मुश्रीफ यांच्यावर निशाणा

कोल्हापूर : विधानसभेची विरोधी पक्षनेता होण्याची संधी हुकल्यामुळे हसन मुश्रीफ यांना दु:ख झाले आहे; त्यामुळे ते माझ्यावर टीका करतात. परंतु ज्यांनी सहकार बुडविला, जिल्हा मध्यवर्ती बॅँक शिल्लक ठेवली नाही, अशा व्यक्तीला माझ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. ‘भाजपच्या यादीत राखीव, बारावा खेळाडू म्हणजे राधाकृष्ण विखे-पाटील’ अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केल्याची बातमी वाचनात आली. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना मुश्रीफच काय, त्यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षच भाजपच्या दारात बारावा खेळाडू म्हणून उभा होता, हे राज्याला माहीत झाले आहे. मुश्रीफ यांना विरोधी पक्षनेते व्हायचं होतं. त्यांची ही संधी माझ्यामुळे हुकली; म्हणून ते आपल्यावर टीका करीत आहेत. ते म्हणाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची टपाल तिकिटे रद्द करण्याच्या केंद्र सरकार निर्णय निषेधार्ह आहे. केवळ द्वेषापोटी टपाल तिकिटे रद्द करणे हा सरकारचा करंटेपणा आहे.सरकार किंवा मंत्र्यांवर जर कोणी टीका केली तर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्याचा सरकारचा अध्यादेश पाहता, हे सरकार लोकशाहीची मुस्कटदाबी करीत आहे.