शिवनाकवाडीत अभियंत्यास घेरावलोकमत न्यूज नेटवर्कआजरा/ इचलकरंजी : जिल्ह्यात वारंवार होणाºया भारनियमनाने जनता वैतागली आहे. खंडित वीजपुरवठ्याबद्दल आजरा तालुक्यातील शिवसैनिकांनी उपजिल्हा संघटक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली वितरण कंपनीच्या विद्युत कार्यालयासमोर शंखध्वनी केला. यावेळी उपअभियंता लोंढे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, दिवाळीचा सण तोंडावर असताना व विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. मुळातच सर्वसामान्यांना रॉकेल मिळत नसताना भारनियमनाचा बडगा उभा करून जनतेला वेठीस धरले जात आहे. आजरा शहर व परिसरात चोºयांचे प्रमाणही वाढले आहे. वन्यप्राण्यांचा वावरही वाढला आहे. अशावेळी वीजपुरवठा होत नाही, ही लांच्छनास्पद बाब आहे. त्यामुळे त्वरित वीजपुरवठा सुरू करावा.
याप्रसंगी उपजिल्हा संघटक संभाजी पाटील, युवा सेनाप्रमुख युवराज पोवार, दिनेश कांबळे, संजय येसादे, आेंकार माद्याळकर, शिवाजी माडभगत, भिकाजी गिलबिले, नारायण कांबळे, धनाजी सावंत, महेश खेडेकर, हणमंत पाटील, उत्तम कांबळे, लहू सावरकर, कृष्णा हसबे, आदी उपस्थित होते.
अब्दुललाट : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास अब्दुललाट येथील मळा भागातील ग्रामस्थांनी घेराव घातला. वारंवारच्या भारनियमनामुळे त्रस्त ग्रामस्थांनी रविवारी (दि. ८) सुमारे दोन तास घेराव घातला.अब्दुललाट येथील महावितरण कंपनीची शाखा शिवनाकवाडी येथे आहे. गेल्या आठ दिवसांपासून बरगाले मळा, दत्तनगर, गुरव पाणंद, आरगे मळा, गवराई मळा, घडसे मळा, टेळे मळा, देवमोरे मळा व इतर भागात वारंवार भारनियमन होत आहे. मळे भागातील ग्रामस्थांना रात्रीचे फिरणे अवघड झाले आहे. तसेच मुलांच्या परीक्षा जवळ आल्याने मुलांना अभ्यास करणे अवघड झाले आहे. मळे भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, यासाठी हा घेराव घालण्यात आला.
महावितरणचे अमर कणसे यांनी, ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष करमगोंडा, कुरुंदवाडचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार यांच्याशी संपर्क साधला व निवेदन देण्यास सांगितले.यावेळी माजी जि. प. सदस्य दादासाहेब सांगावे, कुंतीनाथ बरगाले, कुबेर बरगाले, मिलिंद बरगाले, राजू गवराई, सुकुमार बरगाले, बाळू बरगाले, कुंतीनाथ बरगाले, ज्ञानेश्वर आरगे, आदी उपस्थित होते.आजरा येथील वीजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी शंखध्वनी करत संताप व्यक्त केला. यावेळी संभाजी पाटील, युवराज पोवार, दिनेश कांबळे, संजय येसादे, ओंकार माद्याळकर, महेश खेडेकर, शिवाजी माडभगत, नारायण कांबळे, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.