गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या गोडसाखर सेवक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी श्री गौळदेव परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी श्री गौळदेव विकास पॅनलेचा धुव्वा उडवून सत्तांतर घडविले. विरोधी पॅनेलने ९ पैकी ९ जागा जिंकल्या. या निकालामुळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण गटाला मोठा धक्का बसला असून, माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे.२५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेच्या आतापर्यंतच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र, दोन वर्षांपूर्वीच्या कारखान्यातील ‘सत्तांतरा’मुळे यावेळची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे व शहापूरकर समर्थक आणि चव्हाण समर्थक कर्मचाऱ्यांत ही चुरशीची लढत झाली. त्यात शिंदे-शहापूरकर समर्थकांनी बाजी मारली.विरोधी गौळदेव परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व मते कंसात - मनोज कदम (३९८) अशोक कुणके (२९३), अरविंद दावणे (३६१), उदय देसाई (३३१), अशोक पाटील (३५९), दिलीप मगदूम (३५४), आप्पाजी कांबळे (४२७), तानाजी नाईक (३५३), एकनाथ कुंभार (३५४).सत्ताधारी गौळदेव पॅनेलचे उमेदवार व मते कंसात - मनोहर देसाई (२५४), रावसाहेब पाटील (२३६), शरदचंद्र पाटील (२८९), येसजी शिंदे (२६३) भाऊसाहेब कोकितकर (२७३), सोमनाथ घेज्जी (२३१) अशोक नाईक (२८४), अशोक कुंभार (२८१), लक्ष्मण कांबळे (२१२). एकूण ६९० पैकी ६४२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष मनोहर देसाई, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व शशिकांत चोथे, विठ्ठल चुडाई, विजय रावण व रमेश मगदूम यांनी केले. (प्रतिनिधी)अध्यक्ष-उपाध्यक्षांचा पराभवसत्ताधारी पॅनेलचे प्रमुख विद्यमान अध्यक्ष मनोहर देसाई व उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह विद्यमान संचालक सोमनाथ घेज्जी यांचा पराभव झाला, तर विरोधी पॅनेलमधून लढलेले मनोज कदम विजयी झाले. ९ जणांच्या संचालक मंडळात ८ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली.
‘गडहिंग्लज’च्या सेवक पतसंस्थेत सत्तांतर
By admin | Published: March 07, 2016 1:30 AM