शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

अंबाईवाडीच्या १८ कुटुंबांचे पुनर्वसन : दरडी कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:56 AM

प्रविण देसाई ।कोल्हापूर : सन २०१४ मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासनाने शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे मूळ गावातच सुरक्षित ठिकाणी दोन एकर जागेवर पुनर्वसन केले आहे. येथील १८ कुटुंबांना जागेचा ताबाही देण्यात आला. जिल्ह्यात भूस्खलन धोक्याच्या यादीत १९ गावे असून, त्यांच्याही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.जुलै २०१४ मध्ये ...

प्रविण देसाई ।कोल्हापूर : सन २०१४ मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासनाने शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे मूळ गावातच सुरक्षित ठिकाणी दोन एकर जागेवर पुनर्वसन केले आहे. येथील १८ कुटुंबांना जागेचा ताबाही देण्यात आला. जिल्ह्यात भूस्खलन धोक्याच्या यादीत १९ गावे असून, त्यांच्याही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.

जुलै २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात माळीणची दुर्घटना घडली होती. दरड कोसळून यामध्ये जीवितहानी झाली हाती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भूस्खलन, तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी तयार केली आहे. त्यानुसार या गावांतील कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांच्या पुनर्वसनाचीही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक धोका असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडी या डोंगरावरील वाडीचे दीड किलोमीटर अंतरावर उखळू गावातच सुरक्षित ठिकाणी जिल्हा प्रशासनाने दोन एकर जागा देऊन पुनर्वसन केले आहे.

या वाडीचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या गावाचा संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्व्हेही केला होता. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा, भूस्खलनाचा सर्वाधिक धोका या गावाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी १५ जूनला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी ४ जूनला या १८ कुटुंबांना जागेची मोजणी करून व सात-बारा नावावर करून जागेचा ताबा दिला.भूस्खलनाच्या धोक्याची गावेराधानगरी तालुक्यातील कुऱ्हाडवाडी, ऐनीपैकी धरमलेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पंडेवाडी, पाटपन्हाळा, सोळांकूर-रामनगर या गावांसह भुदरगड तालुक्यातील पडखंबेपैकी खोतवाडी, पडखंबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कारिवडेपैकी हाणफोडेवाडी, टिक्केवाडी, गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी (सामानगडाच्या पायथ्याशी), पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी, शाहूवाडी तालुक्यात उखळूपैकी अंबाईवाडी या गावांचा भूस्खलनाच्या धोक्याच्या यादीत समावेश आहे. 

भूस्खलनाचा व दरड कोसळण्याचा धोका असलेल्या उखळूपैकी अंबाईवाडी या गावाचे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसन केले आहे. जिल्हा प्रशासनाने येथील १८ कुटुंबांना जमीन देऊन त्यावर प्लॉट पाडून त्यांच्या ताब्यात दिले आहेत.- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी