शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

प्रश्न नाकारणे म्हणजे ‘कुलगुरूंचा पळपुटेपणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:07 AM

शिवाजी विद्यापीठाची बदनामी होत असताना प्रश्न टाळणे, नाकारणे म्हणजे ‘कुलगुरूंचा पळपुटेपणा’ अशी भावना सदस्यांंमध्ये निर्माण होईल, असा उल्लेख विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) सदस्य नीळकंठ खंदारे यांनी केल्यावरून अधिसभेत शुक्रवारी जोरदार वादावादी झाली. या उल्लेखाबाबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सभागृहात योग्य आणि काळजीपूर्वक शब्दप्रयोग व्हावेत, अशा शब्दांमध्ये सुनावले.

ठळक मुद्दे‘सुटा’ सदस्याच्या उल्लेखावरून अधिसभेत जोरदार वादशब्दप्रयोगाबाबत कुलगुरूंनी सुनावले

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची बदनामी होत असताना प्रश्न टाळणे, नाकारणे म्हणजे ‘कुलगुरूंचा पळपुटेपणा’ अशी भावना सदस्यांंमध्ये निर्माण होईल, असा उल्लेख विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) सदस्य नीळकंठ खंदारे यांनी केल्यावरून अधिसभेत शुक्रवारी जोरदार वादावादी झाली. या उल्लेखाबाबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सभागृहात योग्य आणि काळजीपूर्वक शब्दप्रयोग व्हावेत, अशा शब्दांमध्ये सुनावले.सभेतील प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी ‘सुटा’चे सदस्य मनोज गुजर यांंनी अधिसभेची सूचना मिळाल्यानंतर वेळेत प्रश्न पाठवूनही तो कार्यक्रमपत्रिकेत अखेरीस दिसतो, तर आणखी एक प्रश्न तांत्रिक कारणावरून नाकारला असल्याचे सांगितले. त्याबाबत कुलगुरूंनी तांत्रिकदृष्ट्या प्रश्न नाकारल्यास त्याची चर्चा येथे होत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर विद्यापीठाची बदनामी होत असताना प्रश्न टाळणे, दाबून ठेवणे, नाकारणे म्हणजे ‘कुलगुरूंचा पळपुटेपणा’ असल्याची भावना निर्माण होईल, असा उल्लेख खंदारे यांनी केला. त्याला विद्यापीठ विकास आघाडीचे सदस्य मधुकर पाटील यांंनी आक्षेप घेतला.

कुलगुरू अध्यक्षस्थानी असून त्यांच्याबाबत असा शब्दप्रयोग करणे हे त्यांचा आणि सभागृहाचा अवमान करण्यासारखे आहे. त्यामुळे खंंदारे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. खंदारे यांनी माफी मागावी अन्यथा सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा अमरसिंह रजपूत, प्रताप माने यांनी दिला. त्यातच खंदारे यांंनी ‘पळपुटेपणा’ हा शब्द मी वापरला नसल्याचे सांगताच पुन्हा सभागृहातील वातावरण तापले. त्यांनी माफी मागावी यासाठी विकास आघाडी आक्रमक झाली. अखेर सभागृहाची भावना लक्षात घेऊन मी दिलगिरी व्यक्त करतो; पण माझ्यावर कोणतेही दोषारोप ठेवू नका, असे आवाहन खंंदारे यांनी केले. त्यानंतर पुन्हा सभागृहातील कामकाज सुरू झाले.

असंसदीय शब्द नकोतअधिसभा हे ज्ञानवंतांचे सभागृह असून आपण सर्वजण शिक्षक आहोत. संस्कार करण्याचे काम आपण करतो. त्यामुळे आपली भाषा, सभागृहातील शब्दप्रयोग योग्य आणि काळजीपूर्वक असले पाहिजेत. असंसदीय शब्द वापरले जाऊ नयेत, असा शब्दांत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी उपस्थितांना सुनावले. 

२० पैकी १३ ठराव मागेया सभेत एकूण २० ठराव मांडण्यात आले होते. त्यापैकी १३ ठराव मागे घेण्यात आले, तर सात मंजूर झाले. मंजूर झालेल्या ठरावांमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचा भत्ता, प्रशासकीय सेवकांसाठी विविध योजना सुरू करणे, एम. फिल., पीएच. डी.चे शोधनिबंध सादर केल्यापासून त्यांचे मूल्यांकन सहा महिन्यांत करावे, आदींचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर