आरएसईपीच्या माध्यमातून भविष्यातील आर्किटेक्ट्ससाठी सांस्कृतिक आणि ज्ञान विनिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भिन्न राज्यांतील आर्किटेक्चर महाविद्यालयांनी एकत्र येऊन त्या त्या राज्याची भौगोलिक माहिती, संस्कृतीची देवाण-घेवाण करावी व त्याचा अभ्यास करावा, असा यामागील मुख्य उद्देश आहे. आपापल्या भागातील हेरिटेज इमारतींचा अभ्यास व त्यांचे दस्तऐवजीकरण, जी इमारत निवडली गेली आहे, ती किती जुनी आहे, ती कशी वापरली गेली याचा अभ्यास करून त्याच्या अहवालाद्वारे 'फीडर ग्रुप' दुसऱ्या राज्यातील सहयोगी महाविद्यालयाच्या 'लर्निंग ग्रुप'ला अभ्यास मदत करतो. यातून दोन राज्यांतील आर्किटेक्चर महाविद्यालये जोडली जाणार आहेत.
या निमंत्रितांच्या चर्चासत्रात डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्टचे प्रा. मधुगंधा मिठारी, विभाग प्रमुख इंद्रजित जाधव, अधिष्ठाता रवींद्र सावंत यांनी सहभाग घेतला.