साहित्यिक बाबुराव शिरसाट म्हणाले, निगवेकर सरांचा प्रवास खडतर होता. त्यांनी प्रचंड परिश्रम आणि अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रातील अत्युच्य स्थान मिळवले होते. प्रास्ताविक संस्थेच्या रजनी हिरळीकर यांनी केले. त्या म्हणाल्या, निगवेकर कुटुंबीयांशी माझे संबंध आहेत. त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो. यावेळी राहुल कुलकर्णी, स्नेहा वाबळे, कुसुम कुलकर्णी, सरोज चौगले, विजयकुमार बागडी आदी उपस्थित होते. प्रकाश केसरकर यांनी आभार मानले.
वाढदिवसाचा खर्च अन्नदानासाठी दिला
कोल्हापूर : येथील विरेन संतराम जाधव या आठ वर्षाच्या बालकाने आपल्या वाढदिवसाचा खर्च जाणीव संस्थेच्या अन्नदान वाटपाकरिता दिला.
जाणीव ही संस्था सीपीआर रुग्णालयातील एआरटी केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या लोकांकरिता मोफत अन्नदान करते. विरेन याने आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करीत तेच पैसे त्याने संस्थेस दिले.