शिरोली/कोल्हापूर :पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) येथे आराम बस उलटल्याने झालेल्या अपघात चालकासह सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता झाला.अधिक माहिती अशी, की साईनाथ ट्रॅव्हलची आराम बस पुणे येथून बुधवारी रात्री साडेदहा वाजता कोल्हापूर मार्गे आजरा येथे जाण्यासाठी बाहेर पडली.
कोल्हापूरजवळ महामार्गावर पहाटे साडेपाच वाजता ही बस भरधाव वेगाने कोल्हापूरच्या दिशेने जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने महामार्गाच्या कठड्याला बस धडकून काही अंतरावर असलेल्या नाल्याच्या कठड्याला जाऊन बस जोरात जाऊन धडकली आणि दोन तीन कोलांट्या खाऊन उलटली.या अपघातात खाजगी आराम बस मधील सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत. उपचारासाठी १५ जणांना सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.सीपीआरमध्ये दाखल जखमींची नावेप्रकाश कृष्णा गुरव (२३ रा. गारगोटी), स्वाती राजेंद्र कुंभार (२७), राजेंद्र आप्पासो कुंभार (३७), नम्रता राजेंद्र कुंभार (वय ५), सुनिल राजेंद कुंभार (वय ३ चौघेही रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर), रेवती सुर्यकांत लोखंडे (२४), सुर्यकांत तय्याप्पा लोखंडे (३३), पृथ्वीराज सुर्यकांत लोखंडे (अडीच वर्षे तिघेही रा. चिक्कोडी), नरसिंह दशरथ गुरव (१७ रा. चंदगड), रेखा संजय पाटील (२२), सहदेव संजय पाटील (२३ दोघेही रा. गगणबावडा), सुरज बाळू डोंगरे (२० आजरा), परसू हंबीरराव देसाई (४६ , कमल परसू देसाई (६५ दोघेही रा. भिडसंगी, ता. आजरा), दीपक बळवंत कदम (२९ रा. आजरा).