गारगोटी : गारगोटी येथील सबपोस्ट ऑफिस व डाक निरीक्षक कार्यालय सयाजी कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित करण्यात आले. या कार्यक्रमात पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार वर्मा आणि प्रवर डाक अधीक्षक ईश्वर पाटील, उद्योगपती सयाजी देसाई हे प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार वर्मा म्हणाले, ग्राहकांना अधिकाधिक तत्पर सेवा पुरवीत आपला विश्वास वृद्धिंगत करत लोकाभिमुख योजना तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथील कर्मचारी कधीही कमी पडणार नाही.
प्रवर डाक अधीक्षक ईश्वर पाटील म्हणाले, सयाजी देसाई यांच्या सहकार्यातून कार्यालयाला कॉर्पोरेट लूक दिला असून "स्माईल आणि सर्व्हिस्" चा नारा कर्मचाऱ्यांना दिला. कोल्हापूर डाक विभागाने देशभरात अव्वलस्थान प्राप्त केले आहे. यामध्ये सर्व कर्मचारीवर्गाचे मोठे योगदान आहे.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि जुने खातेदार व एजंटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास उद्योगपती सयाजी देसाई, एएसपी संजय वाळवेकर, पेमेंट बँकेचे कोल्हापूर विभागाचे व्यवस्थापक अमोल कांबळे, विभागीय व्यवस्थापक भरत पगार, एएसपी संदीप कडगावकर, डाक निरीक्षक राजेंद्र कांबळे-पाटील, गारगोटी डाक निरीक्षक नीलकंठ मंडल, सबपोस्ट मास्तर अनिलकुमार पाटील व गारगोटी उपविभागातील सर्व कर्मचारी, अल्पबचत एजंट, ग्राहक उपस्थित होते.
प्रास्ताविक संजय पताडे, स्वागत संजय वाळवेकर यांनी केले. आभार नीलकंठ मंडल यांनी मानले.
चौकट
कोल्हापूर विभागात भुदरगड तालुक्यातील १७ शाखांद्वारे ५९ गावांना ७५ हजार खातेदारांना सेवा पुरविणारे हे जिल्ह्यातील अग्रगण्य पोस्ट कार्यालय असल्याचे पोस्टमास्टर अनिल पाटील यांनी सांगितले.
२० गारगोटी पोस्ट ऑफिस
फोटो ओळ : उद्घाटनानंतर केक कापून आनंदोत्सव साजरा करताना डॉ. विनोद कुमार, ईश्वर पाटील, अनिलकुमार पाटील आदी.