शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

‘रेमडेसिविर’ काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:25 AM

कोल्हापूर : कोविड आजारावर जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री करणारी तिघांची टोळी स्थानिक ...

कोल्हापूर : कोविड आजारावर जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री करणारी तिघांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड केली. सचिन दौलत जोगम (वय ३०, रा. कणेरकरनगर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ गाव- गोतेवाडी, ता. धामोड, ता. राधानगरी), प्रणव राजेंद्र खैरे (२५, रा. मराठा बोर्डिंग हाउस, दसरा चौक, कोल्हापूर, मूळ गाव- यल्लाम्मा चौक, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), प्रकाश लक्ष्मण गोते (२५, रा. राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ गाव- गोतेवाडी, ता. धामोड, जि. कोल्हापूर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून तीन रेमडेसिविर औषधांच्या बाटल्या व साहित्य, असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असताना इंजेक्शनचा साठा करून काळ्याबाजारात २,३०० रुपयांना इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने बागल चौक परिसरात जयराज पेट्रोल पंपाशेजारी सापळा लावला. त्यावेळी सचिन जोगम व प्रणव खैरे या दोघांना पकडले. त्यांच्या ताब्यातून तीन रेमडेसिविर औषधांच्या बाटल्या मिळाल्या. चौकशी करताना त्यांच्या रॅकेटमध्ये प्रकाश लक्ष्मण गोते हाही असल्याचे लक्षात आले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पो.नि. तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने केली.

...असे होते तिघांचे रॅकेट कार्यरत

अटक केलेल्यातील सचिन जोगम हा बागल चौक परिसरातील एका मेडिकल दुकानात नोकरीस आहे. ज्या लोकांना रेमडेसिविर औषधांची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी तो काळ्याबाजाराने जादा दराने उपलब्ध करून देत होता. त्याचा सहकारी प्रणव खैरे हा वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो बेलबाग, मंगळवार पेठेतील एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहे, तर दुसरा सहकारी प्रकाश गोते, हा शिवाजी उद्यमनगरातील एका ट्रस्टच्या रुग्णालयात नोकरीस आहे. प्रकाश व प्रणव हे दोघे आपल्या रुग्णालयातील रेमडेसिविर हे औषध सचिन जोगम याला पुरवत होते व सचिन हा गरजूंना जादा दराने विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

रुग्णालयातील शिल्लक रेमडेसिविर २,३०० रुपयांना

प्रणव व प्रकाश हे दोघेही नोकरी करत असलेल्या रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार करताना शिल्लक राहिलेली रेमडेसिविर औषधे जादा दराने सचिन जोगम यास विकत होते व सचिन हेच औषध तब्बल २,३०० रुपयांना विकत असल्याचे निष्पन्न झाले.

सलग दुसऱ्या टोळीचा पर्दाफाश

पंधरा दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रेमडेसिविर औषध काळ्याबाजारात विक्री करणारी चौघांची टोळी निष्पन्न करून ती गजाआड केली होती. त्यामध्ये औषध कंपनीचा एरिया सेल्स मॅनेजरसह औषध दुकानात नोकरीस असलेल्यांचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्यानंतर ही तिघांच्या टोळीचा पर्दाफाश केला.

फोटो नं. ०९०५२०२१-कोल- सचिन जोगम (आरोपी), प्रणव खैरे (आरोपी), प्रकाश गोते (आरोपी).

===Photopath===

090521\09kol_7_09052021_5.jpg~090521\09kol_8_09052021_5.jpg~090521\09kol_9_09052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. ०९०५२०२१-कोल- सचीन जोगम (आरोपी), प्रणव खैरे (आरोपी), प्रकाश गोते (आरोपी)~फोटो नं. ०९०५२०२१-कोल- सचीन जोगम (आरोपी), प्रणव खैरे (आरोपी), प्रकाश गोते (आरोपी)~फोटो नं. ०९०५२०२१-कोल- सचीन जोगम (आरोपी), प्रणव खैरे (आरोपी), प्रकाश गोते (आरोपी)