शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

आरक्षणास धक्का लावल्यास याद राखा;प्रकाश शेंडगेंचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:55 AM

कोल्हापूर : ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा देत २५ फेब्रुवारीच्या मुंबईतील मोर्चाने राज्य सरकारची झोप ...

कोल्हापूर : ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा देत २५ फेब्रुवारीच्या मुंबईतील मोर्चाने राज्य सरकारची झोप उडेल, असा विश्वास माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी कोल्हापुरात रविवारी दिला.ओबीसी, भटक्या विमुक्त एल्गार मोर्चा व जनजागरण परिषदेत अध्यक्षस्थानवरून शेंडगे बोलत होते. यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, प्रा. टी. पी. मुंडे यांच्यासह ओबीसीतील विविध जातींचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आवाजी व हात उंचावून विविध ठराव मंजूर करण्यात आले. आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे ही परिषद झाली. तत्पूर्वी, बिंदू चौक ते जनजागरण परिषदस्थळी एल्गार मोर्चा काढण्यात आला.प्रकाश शेंडगे म्हणाले, राज्य सरकारने आमच्या ओबीसी आरक्षणामधून ‘एससीबीसी’ला आरक्षण दिले. कोणत्याही स्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला हात लावू देणार नाही. यासाठी २५ ला विधान भवनावर निघणाऱ्या मुंबर्ईतील मोर्चात ओबीसी, भटक्या विमुक्त बांधवांनी उपस्थित राहावे. राज्य सरकारने आमची फसवणूक केली आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून पाच लाख ओबीसी बांधव येतील व सरकारला याची धडकी भरेल. याचे रणशिंग आजपासून फुंकले असे समजावे. आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, धक्का लावाल याद राखा.हरिभाऊ राठोड म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान दिवंगत व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. त्यामुळे ओबीसीला आरक्षण मिळाले. आता लढायचे असेल तर १२ बलुतेदार, भटक्या-विमुक्त जाती-जमातींनी एकत्र आले पाहिजे. लोकसंख्येची नोंदणी करणे गरजेचे आहे. केंद्रातील सरकार भारतीय संविधानाला मानत नाही. देश संविधानावर चालत नाही. तेथे हुकूमशहा बसले आहेत.प्रा. टी. पी. मुंडे म्हणाले, ओबीसी, भटक्या विमुक्तांसाठी सर्वांनी रस्त्यावर आले पाहिजे. २५ फेब्रुवारीच्या मोर्चात सहभागी व्हावे.यावेळी प्रा. श्रावण देवरे, कल्याण दळे, चंद्रकांत बावकर, कल्लाप्पा गावडे, रफिक कुरेशी, जी. डी. तांडेल, अरुण खरमाटे, विलास काळे, ज्ञानेश्वर गोरे, आदींंनी मते व्यक्त केली.प्राचार्य शिवाजीराव माळकर यांनी स्वागत, तर दिगंबर लोहार यांनी प्रास्ताविक केले.