दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने बंद असलेला मुख्य रस्ता खुला होण्याच्या मार्गावर आहे.
शिरगाव आमजाई व्हरवडे चक्रेश्वरवाडी हा मुख्य रस्ता आमजाई व्हरवडे येथे अतिक्रमण झाल्याने सहा वर्षांपासून बंद आहे. याबाबत गेल्या चार वर्षांपासून आमजाई व्हरवडे येथील सरपंच व ग्रामस्थ यांनी तहसील आँफिस व संबंधित विभागाच्या ऑफिसचे उंबरे झिजविले होते. मात्र काही मुरदाड अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीने या रस्त्यावरील अतिक्रमण निघाले नाही. याचा फटका चार-पाच गावांच्या लोकांना बसला आहे.
याबाबत आमजाई व्हरवडेचे सरपंच आनंदराव कांबळे, माजी सरपंच राजेंद्र चौगले, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, कृष्णात चौगले, ब. ज्ञा. पाटील. शंकर पाटील, आर. के. टिपुगडे, उत्तम पाटील, बिराज कांबळे, एस. के. कांबळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची काल भेट घेऊन याबाबत सविस्तर कल्पना देऊन निवेदन दिले.