यासंदर्भात अनेकदा महावितरणचा कार्यालयात खांब बदलावेत म्हणून निवेदने दिली आहेत. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच खांब बदलणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
ऐनी हे दुर्गम भागात वसलेले खेडेगाव असून, जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा गावात लाईट आली, त्यावेळी बसविलेले गावातील सर्व विद्युत खांब जीर्ण होऊन सडलेले आहेत. अनेक खांबांना तळातून वेल्डिंग करून दुसऱ्या खांबाचा आधार दिला आहे. यातील पाच ते सहा खांब कोणत्याही क्षणी कोसळणाच्या अवस्थेत आहेत. फक्त वरील विद्युत तारांचा आधारावर उभे आहेत. याभागात पावसाळ्यात सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. लोकवस्तीत असणाऱ्या या विद्युत पोलशेजारी नेहमी आबालवृद्धांसह जनावारांची रेलचेल असते. एखादा अनर्थ घडण्यापूर्वी सदरचे विद्युत खांब बदलावेत, अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्यावतीने जोर धरू लागली आहे.