उचगाव : उचगाव (ता. करवीर)येथील गावकामगार तलाठी यांची त्वरित बदली करण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. तलाठ्यांकडून सर्वसामान्य लोकांना अरेरावीची भाषा वापरली जाते. पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. एजंटमार्फत कामे करून घेतली जात आहेत. येथील तलाठी हे गेली तीन महिने सतत कामावर गैरहजर असल्याने तलाठी कार्यालय बंद असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. लोकांना सातबारा वेळेवर मिळत नाहीत. तलाठी हे बिल्डर लॉबीची कामे आर्थिक घडामोडीतून करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील पोवार, दीपक रेडेकर, राजू यादव, सचिन देशमुख, कीर्ती मसुटे, सतीश मुसळे, विनायक जाधव, रमेश वाईगडे, अनिल दळवी, अरविंद शिंदे, दीपक काळे उपस्थित होते.
कोट :
गेल्या चार वर्षांत कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार नाही. रहिवासी दाखला सोडला तर सर्व दाखले पोर्टलवर ऑनलाइन मिळतात. काही गुंठेवारी व बिल्डिंगची अनधिकृत बांधकामे आहेत त्यासाठी काहीजण माझ्यावर जबरदस्ती करत आहेत.
- महेश सूर्यवंशी,
तलाठी, उचगाव.