शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

कोल्हापुरात'मेक इन इंडिया'ची प्रतिकृती - दुचाकीचे वापरले ३०० स्पेअरपार्ट ; उदय पाटील व नझीम महात यांनी केली मेहनत- -- हट के न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:38 AM

कोल्हापूरच्या दुचाकी-चारचाकी मेस्त्रींचे नेहमीच त्यांच्या नवउपक्रमांमुळे नाव चर्चेत राहिले आहे. सध्या ‘मेक इन इंडिया’चा अधिक बोलबाला असून, याच धर्तीवर येथील नझीम महात व उदय पाटील या

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च फौंडेशनतर्फे सदस्यांचेही विशेष सहकार्य

- शेखर धोंगडे।कोल्हापूर : कोल्हापूरच्यादुचाकी-चारचाकी मेस्त्रींचे नेहमीच त्यांच्या नवउपक्रमांमुळे नाव चर्चेत राहिले आहे. सध्या ‘मेक इन इंडिया’चा अधिक बोलबाला असून, याच धर्तीवर येथील नझीम महात व उदय पाटील या मेकॅनिकनी मेक इन इंडियाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे.

नझीम महात व उदय पाटील यांनी सलग दोन महिने अविरत परिश्रम घेऊन स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष करून दुचाकीच्या गाड्यांचे जुन्या स्क्रॅपमधील जवळजवळ तीनशे वस्तू एकत्र करून वेल्डिंगच्या साहाय्याने, उपलब्ध साधनातून पावडर कोटिंग करून घेतले. सिंहाचे मूर्तरूप म्हणजेच मेक इन इंडियाची असलेली प्रतिमा ही विचारात घेऊन तिला मूर्त स्वरूप देण्याचे काम या दोघांनी केले.

याचे एक वेगळेपण म्हणजे जशीच्या तशी ती सिंहरूपी प्रतिमा त्यांनी डोळ्यासमोर उभी केली आहे. त्याच्या आयाळापासून पायाच्या नखांपर्यंत तो जिवंत वाटावा याच्यासाठी मध्यभागी फिरते चक्र इलेक्ट्रीक मोटरद्वारे बसवून त्यांनी हे काम पूर्ण केले आहे. त्याला सोनेरी रंगकाम केल्याने ती प्रतिकृती अधिक आकर्षक वाटते. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च फौंडेशनतर्फे भरविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात या प्रतिकृतीने लक्ष वेधून घेतले. सध्या ही प्रतिकृती कोल्हापूर शहरातील वाय. पी. पोवार नगर येथे रेहान अ‍ॅटोमध्ये पाहण्यासाठी ठेवली आहे. अ‍ॅटोक्षेत्रात खूप काही करण्यासारखे असते, केवळ मेहनत व आपली बुद्धिमत्ता वापरल्यास नक्कीच त्यात यश मिळू शकते असे महात व पाटील यांनी सांगितले. 

 

सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहण्यापेक्षा कौशल्य वापरून मेक इन इंडियामध्ये आपण नेहमीच सहभागी राहिले पाहिजे, याच प्रेरणेने ही प्रतिकृती तयार केली आहेय- नझीम महात, मेकॅनिक.

 

कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च फौंडेशनच्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्याने ही प्रतिकृती तयार केली आहे. ती जिवंत वाटावी म्हणून त्यामध्ये खूप बदल केले आहेत.

- उदय पाटील, मेकॅनिक.

 

 

टॅग्स :Make In Indiaमेक इन इंडियाtwo wheelerदुचाकीkolhapurकोल्हापूर