शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हे नोंदवा

By admin | Published: April 06, 2017 2:55 PM

काँग्रेसची मागणी : जबाबदार घटकावर कारवाई करा

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ६ : राज्यात कर्ज वसूलीच्या तगाद्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांवर राज्य शासनाने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवावेत अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांच्याकडे केली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हंटले की, कर्ज वसुलीसाठी तगादा म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यात दोन वर्षात आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ८० टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वित्तीय संस्थांकडून घेतलेले अर्ज न फेडता आल्याने झालेल्या आहेत, हेही राज्य सरकारने मान्य केले आहे. कर्ज फेडीसाठी बँकांचा तगादा, सावकारांची आरेरावी, धमक्या यांचा भडीमार चालू असतो. कर्जबाजारीपणा नाचक्की, नामुष्की पदरात पडणार या चिंतेने आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अल्पभूधारक व छोटे शेतकरीच आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी या मागण्या शासन दरबारी पोहचविण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांनी शिष्टमंडळास सांगितले.या शिष्टमंडळात, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक सर्वश्री प्रविण केसरकर, मोहन सालपे, संजय पाटील, राज्य ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य संजय पाटील, गणी आजरेकर, संपतराव पाटील, महमद शेख, दुर्वास कदम, संग्राम गायकवाड, साताप्पा कांबळे, अनिल भोसले, रविंद्र राऊत, सरपंच तानाजी सासने, प्रदीप पाटील आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)