कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठातील पदवी प्रमाणपत्र दुबार छपाईचा अहवाल कुलपतींकडे पाठविण्याचा निर्णय व्य़वस्थापन परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. चौकशी समितीने या परिषदेसमोर दुसऱ्यांदा अहवाल सादर केला.तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्या कारकिर्दीत झालेल्या ५४ व्या दीक्षान्त समारंभावेळी पदवी प्रमाणपत्राच्या दुबार छपाईचा प्रकार घडला. त्यावर विविध संघटनांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर विद्यापीठाने डॉ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली.
या समितीने दिलेल्या पहिल्या अहवालामध्ये संदिग्धता असल्याने व्यवस्थापन परिषदेने फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार या समितीने यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस कुलगुरूंकडे अहवाल दिला. पण, काही कारणामुळे व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली नाही. ही बैठक शुक्रवारी झाली. त्यात समितीकडून अहवाल सादर करण्यात आला. त्यात विद्यापीठ प्रशासनावर दोष ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल आता कुलपतींकडे पाठविण्याचा निर्णयकंत्राटी शिक्षकांच्या निर्णयासाठी समितीविद्यापीठातील विविध अधिविभागातील अकरा महिन्यांच्या करारावरील कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.