कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत शिवसेनेने भाजपसह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइं व रासपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने प्रचार केला तसेच कोणी विरोधी भूमिका घेतली, याबाबतचा सर्व्हे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या टीमने केला. सर्व्हेनंतर वस्तुस्थितीजन्य अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘मातोश्री’वर नुकताच पाठविण्यात आला.सर्व्हे करण्यासाठी प्रशांत किशोर यांची शंभर जणांची टीम कार्यरत होती. त्यांच्याकडून दररोज कोल्हापुरातील टीमकडे अहवाल येत होता. रिक्षावाले, पानटपरीवाले, कामगार, महिला, तरुण यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली जात होती. या अहवालावर पक्षनेतृत्व काय निर्णय घेते, याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सेना-भाजपच्या प्रचाराचा लेखाजोखा ‘मातोश्री’वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 3:44 AM