शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

सहा देशांतील प्रतिनिधींचा शिवरायांना मुजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 11:28 PM

चंदीगडला रोटेशिया परिषद : भारतासह श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भुतानमधील प्रतिनिधींचा सहभाग

सातारा : ‘शिवरायांचे आठवावे रुप, आठवावा प्रताप या भुमंडळी...’ शिवरायांच्या जीवनातील प्रसंग उभा राहिला तरी शरीरातील रक्त उफाळून येतं. यासाठी देशाच्या भौगोलिक सीमा गळून पडतात. याचाच प्रत्यय चंदीगडमध्ये आला. रोट्रॅक्टच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत साताऱ्याच्या तरुणांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सादर केली. यावेळी शिवरायांचे दर्शन होताच सहा देशांतील प्रतिनिधींनी उभे राहून सलामी दिली.आशिया खंडातील प्रमुख देशांमधील रोट्रॅक्ट (रोटेशिया) आंतरराष्ट्रीय मल्टी डिस्ट्रीक्ट परिषद दि. २३ ते २६ फेबु्रवारी या कालावधीत चंदीगड येथे पार पडली. यामध्ये भारताबरोबरच बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भुतान या देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेत सहभागी रोट्रॅक्टला पाच मिनिटांत कला सादर करण्याची स्पर्धा भरवली होती. यामध्ये महाराष्ट्रातून सातारा, औरंगाबाद, लातूर आदी जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या तीस तरुणांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम सादर केला. अवघ्या पाच मिनिटांत तो बसवून सादर केला. औरंगाबादचे केतन पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले.महाराष्ट्राचे दर्शन घडवत कार्यक्रमाची सुरुवातच छत्रपती शिवरायांच्या रुबाबदार प्रवेशाने झाली. यावेळी शिवराज्याभिषेकाचा प्रसंग साकारण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ चा जयघोष सुरू झाला. संपूर्ण सभागृहात आवाज घुमत राहिला अन् उपस्थितांनी उभे राहून सलामी दिली. या कार्यक्रमाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये साताऱ्यातून संतोष शिंदे, शंतनू खलीकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)साताऱ्याची मी गुलछडी...या कार्यक्रमात साताऱ्यातून राज्यभरातून सहभागी झालेल्या तरुणींनी लावणी सादर केली. ‘साताऱ्याची मी गुलछडी...’ या लावणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विठ्ठल-विठ्ठल...विठू-माउलीच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर दूरून जाणारी वारी देखील मराठी माणसाच्या जीवनाचा एक भाग बनली आहे. हा प्रसंगही यावेळी सादर करण्यात आला.