शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

सोळांकूरच्या संशोधकाने शोधली केना कुळातील नवीन वनस्पती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:21 AM

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातच आढळणाऱ्या केना कुळातील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या नवीन प्रजातीचा शोध कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकूर येथील डॉ. ...

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातच आढळणाऱ्या केना कुळातील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या नवीन प्रजातीचा शोध कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकूर येथील डॉ. मयूर नंदीकर या वनस्पती संशोधकाने लावला आहे. यासंदर्भातील लेख नीळावंती या नावाने अमेरिकेच्या ब्रिटोनिया विज्ञान ग्रंथात १९ मार्च रोजी प्रसिद्ध झाला आहे. ही अनोखी, नवीन आणि प्रदेशनिष्ठ प्रजात कॉमेलीना यंगी (Commelina youngii Nandikar) या नावाने यंग यांना समर्पित करण्यात आली आहे.

डॉ. नंदीकर हे केना कुळातील वनस्पतींचे अभ्यासक आहेत. सध्या ते सातारा जिल्ह्यातील नवरोजी गोदरेज सेेंटर फॉर प्लांट रिसर्चचे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. लंडनच्या ब्रिटिश वनस्पती संग्रहालयाला १८ जून २०१९ रोजी डॉ. नंदीकर यांनी भेट दिली, तेव्हा भारतातील केना कुळातील वनस्पती संग्रहात अल्फ्रेड प्रेन्टिस यंग या संग्राहकाने १९ नोव्हेंबर १८७९ रोजी सुनाल (बेळगाव, कर्नाटक) येथून जमा केलेली वेगळी प्रजाती पाहण्यात आली.

या १४० वर्षे जुन्या असलेल्या या मृत वनस्पती यंग यांनी निपाणी, फोंडा, पाटगाव, पाली, भुदरगड, निढोरी, धारवाड या परिसरातून जमा केल्या हाेत्या. भारतात आल्यानंतर अभ्यास करता करता डॉ. नंदीकर यांना बागलकोट परिसरात याच प्रजातीची जिवंत वनस्पती आढळल्याने ही नवी प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले.

१८७९ मध्ये यंग यांना आढळलेल्या या वनस्पतीच्या पानाचा आकार, देठ, फुले, शिरा, बिया या भारतात सापडणाऱ्या केना कुळातील वनस्पतींपेक्षा वेगळी होती. यातून मृत वनस्पती आणि त्यांची साठवणूक यांचे महत्त्व स्पष्ट होते. सीमाभागातील उष्ण तापमान असलेल्या वालुकामय प्रदेशात १५ सेंटीमीटरपर्यंत वाढणाऱ्या या वनस्पतीच्या बिया मऊ आणि गुळगुळीत असतात.

देठाच्या शिरा गडद लाल रंगाच्या तर फुले निळ्या रंगांची असतात. भारतात आढळणाऱ्या सर्वात लहान आकाराची ही वनस्पती आहे. या कूळातील सुमारे ३० ते ४० प्रजाती आढळतात. डॉ. नंदीकर यांनी यापूर्वी यातील तीन प्रजातींचा शोध लावला आहे. त्या कर्नाटकातील बदामी, सूतगट्टी आणि अंदमान येेथे आढळल्या होत्या.

यासंदर्भातील डॉ. नंदीकर यांचा संशोधनपर लेख न्यूयॉर्कच्या ब्रिटोनिया विज्ञान ग्रंथात १५ मार्च २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. यात पूर्वार्धात अल्फ्रेड यंग यांच्या वनस्पती संग्रहाविषयी तर उत्तरार्धात केना कुळातील या प्रदेशनिष्ठ वनस्पतींविषयी माहिती प्रकाशित केली आहे. या संशोधनासाठी डॉ. नंदीकर यांना नवरोजी गोदरेज वनस्पती संशोधन केंद्राचे संचालक विजय व स्मिता कृष्णा, गोदरेज फौंडेशनचे डॉ. हेनरी नॉल्टी, लंडनचे वनस्पती अभ्यासक डॉ. नॉर्बर्ट होलस्टिन, राणी तिवारी व फ्रान्सेका हिलर यांचे सहकार्य लाभले.

-------------------------------------------------

फोटो : 23032021-Kol-mayur nandikar.jpg

डॉ. मयूर नंदीकर

23032021-Kol-youngi.jpg

अल्फ्रेड यंग

23032021-Kol-commelina youngii

कॉमेलीना यंगी (केनी वनस्पतीची नवीन प्रजात)

===Photopath===

230321\23kol_1_23032021_5.jpg~230321\23kol_2_23032021_5.jpg

===Caption===

फोटो : 23032021-Kol-mayur nandikar.jpgडॉ. मयूर नंदीकर~23032अल्फ्रेड यंग021-Kol-youngi.jpg