शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शिवसेनेतील नाराजी उफाळली

By admin | Published: October 13, 2015 12:36 AM

महापालिका निवडणूक : बिडकर यांची उमेदवारी डावलल्याने उपशहरप्रमुख पदाचा राजीनामा

कोल्हापूर : शिवसेनेच्या अंतिम यादीतील बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या व्हीनस कॉर्नर प्रभागाचा निर्णय सोमवारी झाला. उपशहरप्रमुख शशिकांत बिडकर यांना डावलून काही दिवसांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या राहुल चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथून उमेदवारी जाहीर झाली. शिवसेनेकडून काल, रविवारी २२ जणांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये ‘व्हीनस कॉर्नर’ प्रभागाचा निर्णय झाला नाही. येथून उपशहरप्रमुख शशिकांत बिडकर व काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेले राहुल चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरू होती. सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राहुल चव्हाण यांना उमेदवारी देत असल्याचे जाहीर करण्यात आले. याबाबतचे पत्र सचिव खा. विनायक राऊत यांच्या सहीने जिल्हाप्रमुख संजय पवार व आ. राजेश क्षीरसागर यांना पाठविण्यात आले. त्याबचरोबर शशिकांत बिडकर इच्छुक असल्यास त्यांना शेजारील कनाननगर प्रभागातून उमेदवारी देण्यात यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.बिडकर यांचा राजीनामामहापालिकेत शिवसेनेची सत्ता येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, ही मनापासून इच्छा आहे. परंतु, ज्यांचा पक्षाशी काडीमात्र संबंध नाही, अशा उपऱ्यांना उमेदवारी दिल्याचे दु:ख आहे. माझ्या मतदारसंघात दुसरा कोणताही शिवसैनिक असता तर त्याग केला असता. मात्र, आपल्यालाच उमेदवारी डावलल्याने आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे उपशहर प्रमुख शशिकांत बिडकर यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.मी सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण, शिवसेनाप्रमुखांचे विचार, धोरण याकडे आकर्षित होऊन शिवसेनेचे काम करू लागलो. गेली २५ वर्षे हे काम अविरतपणे करीत आहे. निश्चित माझी आर्थिक परिस्थिती कमी असेल. परंतु, शिवसेनेच्या माध्यमातून व माझ्या कामाच्या जोरावर जमा केलेले कार्यकर्त्यांचे मोहोळ ही आपली संपत्ती आहे. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी निश्चित मला व माझ्यासारख्या सच्च्या शिवसैनिकाला मिळणार, याची खात्री होती. परंतु, सर्व पक्षांनी इलेक्टिव्ह मेरिट नाही म्हणून नाकारलेल्या उमेदवारांना आमच्याकडे बाकी इलेक्टिव्ह मेरिट लावले गेले. सत्तेसाठी आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांचा बळी देण्यात आला, हे दुर्दैवी आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडले आहे. म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून, याबाबतच्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविण्यात आल्या आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसची दोन जागांसाठी उमेदवारी जाहीरकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने सोमवारी रात्री प्रलंबित दोन प्रभागांतील उमेदवारांची चौथी व अंतिम यादी जाहीर केली. यामध्ये प्रभाग क्रमांक ४५ (कैलासगडची स्वारी मंदिर) मधून सुरेश रामचंद्र साबळे, तर प्रभाग क्रमांक ८१ (क्रांतिसिंह नाना पाटीलनगर - जिवबा नाना पार्क) येथून श्रीनंद शामराव कांबळे (जोगेंद्र कवाडे गट) यांची उमेदवारी जाहीर केली.राष्ट्रवादीची यादी; प्राजक्ता लाड, तुषार लोहारांना संधीकोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने आपली तिसरी अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध केली. यामध्ये प्राजक्ता सचिन लाड व तुषार रामचंद्र लोहार यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने यापूर्वी दोन याद्यांतून ७९ उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली होती. उर्वरित पोलीस लाईन व बलराम कॉलनी हे प्रभाग प्रलंबित ठेवले होते. प्रभाग क्रमांक ६ (पोलीस लाईन) मधून प्राजक्ता सचिन लाड व प्रभाग क्रमांक ५२ (बलराम कॉलनी) येथून तुषार रामचंद्र लोहार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संधी देण्यात आली आहे.