शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

आरक्षण एक विचार--दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:31 PM

आरक्षण सर्व समस्यांवरचा रामबाण उपाय असाच हल्ली सर्वांचा समज झाला आहे. यामुळेच अनेक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत आहेत,

चंद्रकांत कित्तुरेआरक्षण सर्व समस्यांवरचा रामबाण उपाय असाच हल्ली सर्वांचा समज झाला आहे. यामुळेच अनेक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत आहेत, आंदोलन करीत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाने अवघा महाराष्टÑ ढवळून निघाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठीचे हे आंदोलन आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे सरकारचीही पंचाईत झाली.

कायदेशीर चौकटीचे बंधन तोडून कसे आरक्षण द्यायचे यावर चर्चेचे गुºहाळ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरची मुदत मागून घेतली आणि मराठा आरक्षणाचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतरही क्रांतिदिनी मराठा समाजाने आपली वज्रमूठ दाखवलीच. सध्या या आंदोलनाची धग थोडी कमी झाली आहे. याचवेळी धनगर समाजासह अन्य समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. आरक्षण नसल्याने आपण शिक्षणात, नोकरीत मागे पडत आहोत, आपली प्रगती खुंटली आहे, असे या सर्वांचे म्हणणे आहे. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने या समाजांना शांत करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायावर शासन पातळीवर विचार सुरू असल्याचे दिसते. यात आर्थिक निकषावर आरक्षणाचा पर्याय पुढे आला आहे. सकृतदर्शनी तो योग्य वाटतो.

मात्र, तो मान्य करणे कुणालाही राजकीयदृष्टया परवडणारे नाही. भारतात अठरापगड जातीचे, विविध धर्माचे, पंथांचे लोक राहतात. मात्र, पूर्वापार चालत आलेल्या जातीव्यवस्थेत मागास राहिलेल्या जातींना स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेद्वारे कायदेशीर आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणामुळे पिढ्यान्पिढ्या मागास राहिलेल्या समाजांना शिक्षणाची, नोकरीची, प्रगतीची दारे खुली झाली. त्यांचाही विकास होऊ लागला. मात्र, आजही तो समाज पूर्णपणे विकसित झाला आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. ओबीसी समाजाबाबतही असेच म्हणता येईल. याचवेळी बहुसंख्याक समाजही आर्थिकदृष्टया मागे पडू लागला. शिक्षण महागडे झाल्याने शिक्षणाची दारे बंद होऊ लागली, नोकऱ्या मिळेनाशा झाल्या, बेरोजगारी प्रचंड वाढली. यातून धुमसणारा असंतोष गेल्यावर्षी मराठा क्रांती मूकमोर्चाद्वारे प्रकट झाला होता. मात्र, वर्षभरानंतरही आरक्षणाचे पाऊल पुढे न पडल्याने ठोक आंदोलनाचा मार्ग अवलंबला गेला. मराठा समाज हा बहुसंख्याक आहे. त्यामुळे खरंच या समाजाला आरक्षण मिळाले तर या समाजाचे सर्व प्रश्न सुटतील असे समजणे चुकीचे ठरणार आहे. शिवाय जातीजातीच्या भिंती अशा आरक्षणाने आणखी मजबूत होणार आहेत. सामाजिक स्वास्थ्यासाठी ते योग्य नाही.

भारत हा सामाजिक सलोख्यासाठी जगभरात ओळखला जातो. सामाजिक स्वास्थ्य हरविल्यास ही ओळखच धोक्यात येऊ शकते. यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण हा पर्याय योग्य वाटतो. ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी हे लाभ सोडण्याची तयारी दाखवायला हवी. शिक्षण, नोकरीसह सर्व स्तरात सर्वांना समान संधी मिळायला हवी. यात मागासवर्गीय समाजाला कुठेही आपल्याला डावलले जाते आहे असे वाटता कामा नये अशी व्यवस्था करायला हवी. याचबरोबर आणखी एक-दोन पर्यायावर समाजात चर्चा सुरू असते ती म्हणजे नोकरीतील आरक्षणाचा लाभ कुटुंबातील एका व्यक्तीलाच द्यावयाचा.

आपल्या कुटुंबाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या वर आणण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर टाकावयाची. प्रत्यक्षात हा पर्याय अशक्यप्राय आणि अव्यवहार्यही वाटतो. कारण स्वत:ची मुले आपल्या आई-वडिलांना बघत नाहीत तेथे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेण्यासाठी सारेच नोकरदार अथवा सरकारचे लाभार्थी पुढे येतील याची कुणीही खात्री देऊ शकणार नाही. दुसरा एक पर्याय म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न एका ठरावीक मर्यादेपलीकडे गेले की त्या कुटुंबाला आरक्षणाच्या लाभातून वगळण्याचा. कारण त्या उत्पन्नात या कुटुंबाच्या सर्व गरजा भागू शकतात. दुसºया एखाद्या गरजू कुटुंबाला किंवा व्यक्तीला त्याचा लाभ मिळू शकतो. आर्थिक निकषावर आरक्षणाचा पर्याय स्वीकारला गेला नाही तरी या पर्यायावर सकारात्मक विचार करायला कोणत्याही जातीधर्मातील कुणीही नकार देईल असे वाटत नाही. यात एक शिक्षणाचा खर्च कमी-अधिक असू शकतो, त्यामुळे तो सरकारने उचलावा. गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जावेत. त्यासाठीच्या सर्व संधी सर्वांना बरोबरीने उपलब्ध करून दिल्या तर या जातीच्या भिंती आपोआपच गळून पडतील.(लेखक ‘लोकमत’चे उप वृत्तसंपादक आहेत.)kollokmatpratisad@gmail.com

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा