शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:37 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज काढण्यात आले.

ठळक मुद्देगडहिंग्लज अनुसूचित जाती महिला; शिरोळ, भुदरगड, करवीर, पन्हाळा सर्वसाधारण महिलाराधानगरी, गगनबावडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाहातकणंगले, कागल, आजरा सर्वसाधारण

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज काढण्यात आले.

गडहिंग्लज अनुसूचित जाती महिला, चंदगड अनुसूचित जाती, राधानगरी आणि गगनबावडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शाहूवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिरोळ-भुदरगड-करवीर आणि पन्हाळा सर्वसाधारण महिलांसाठी तर हातकणंगले-कागल आणि आजरा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे.उपजिल्हाधिकारी महसूल यांनी श्रावण क्षीरसागर यांनी सुरूवातील सर्वांचे स्वागत करून सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील 12 तालुक्यांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 यापैकी 1 महिलेसाठी आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 3 पैकी 2 महिलांसाठी तर सर्वसाधारणसाठी एकूण 7 पैकी 4 महिलांसाठी आरक्षण असणार आहे. या आरक्षण निश्चितीसाठी 1995 ते 2017 या कालावधीतील यापूर्वी पडलेल्या आरक्षणाचा विचार यावेळी करण्यात आला.लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने तालुके विचारात घेवून आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये गडहिंग्लज 10.09 टक्के आणि चंदगड 8.88 टक्के या पंचायत समिती अनुसूचित जातीसाठी निश्चित झाल्या. अनुसूचित जाती महिला आरक्षण काढताना चंदगड तालुक्यात सन 1999 साली अनुसूचित जाती महिला आरक्षण असल्याने 2019 साठी गडहिंग्लज तालुक्याला अनुसूचित जाती महिला आरक्षण थेट निश्चित झाले आणि उरलेल्या चंदगड तालुक्यास अनुसूचित जाती आरक्षण झाले.नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणासाठी गडहिंग्लज व चंदगड हे 2 तालुके वगळून ज्या तालुक्यांचे आरक्षण तीनवेळा पडलेले आहे ते वगळण्यात आले. ज्या तालुक्यांचे आरक्षण कमीत-कमी दोनवेळा पडलेले आहे असे शाहूवाडी, राधानगरी व गगनबावडा या तालुक्यांना निश्चित करण्यात आले.

यामध्ये 2012 मध्ये शाहूवाडी तालुक्यात महिला आरक्षण होते. त्यामुळे 2019 साठी शाहूवाडी तालुक्यास नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण निश्चित झाले. उर्वरित राधानगरी व गगनबावडा हे तालुके नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले.सर्वसाधारण प्रवर्गासाठी गडहिंग्लज-चंदगड-राधानगरी-गगनबावडा-शाहूवाडी हे तालुके वगळण्यात आले. उर्वरित शिरोळ-करवीर-कागल-पन्हाळा-हातकणंगले-भुदरगड व आजरा या 7 पंचायत समिती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या.

यामधील हातकणंगले तालुक्यास तीनवेळा सर्वसाधारण महिला आरक्षण आले असल्यामुळे या तालुक्यास वगळण्यास आले. उर्वरित कागल व आजरा तालुक्यास 2017 साठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे चक्राकारप्रमाणे आरक्षण द्यायचे असल्यामुळे हे दोन्ही तालुके सर्वसाधारण महिला आरक्षणातून वगळण्यात आले.सर्वसाधारण महिला या पदाकरिता उर्वरित शिरोळ-भुदरगड-करवीर आणि पन्हाळा हे तालुके सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात आले. त्यामुळे हातकणंगले कागल व आजरा हे तालुके सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले.तहसिलदार अर्चना कापसे, दीपक पाटील, संजय जाधव, विद्याधर गुरबे, केराप्पा हासूरी, रूपाली कांबळे, श्रीया कोणेकरी, इंदूताई नाईक, सुभाष देसाई, वकील अनंत कांबळे, राजगोंडा पाटील, मनिषा शिवणगेकर, राजवर्धन मोहिते, जालिंदर नांगरे, सरदार पाटील, रमेश कांबळे, महादेव कांबळे, स्वरूप पाटील, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीreservationआरक्षणkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी