मुरगूड : गेल्या चार वर्षांपासून आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज विविध स्तरावर आंदोलन करीत आहे. मूक मोर्चा, ठोक मोर्चा आणि आता ठिय्या आंदोलन, पण अद्यापही सरकारला जाग आलेली नाही. त्यांचा हेतू स्पष्ट नाही. त्यामुळे आयुष्यभर संघर्ष पाचवीला पूजलेल्या मराठा समाजाला संघर्ष केल्याशिवाय आरक्षण मिळणार नसल्याने आपण आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या मागे ठाम आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले.मुरगूड (ता. कागल) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरूअसणाºया ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रा. मंडलिक आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते उपस्थित तरुणांना गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. संतोष भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जैन समाज, खाटीक समाज, कागल वकील बार असोसिएशन, व्यापारी संघटना, दलित महासंघ, पत्रकार संघ, आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.यावेळी प्रा. संजय मंडलिक म्हणाले, मराठा समाजाची मागणी रास्त आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रभातफेरीत सुमारे पाचशे पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, दलितमित्र डी. डी. चौगले, शिवाजीराव चौगले, जीवन शिंदे, धनाजी गोधडे, सुधीर सावर्डेकर, रणजित सूर्यवंशी, पांडुरंग भाट, सुनील मंडलिक, दीपक शिंदे, भगवान लोकरे, दत्तात्रय मंडलिक, रवी परीट, नीलेश शिंदे, बी. एम. पाटील, अमिततोरसे, सर्जेराव पाटील उपस्थित होते. संजय भारमल यांनी आभार मानले.पालकमंत्र्यांचाजाहीर निषेधयावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व जिल्हा परिषद सदस्यांना सुमारे दोन तास ताटकळत ठेवत संभाजी भिडे यांना भेट दिली. ज्या भिडेंवर आरोप होत आहेत त्यांची महत्त्वाच्या विषयावरील चर्चा सोडून भेट घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करीत चंद्रकांत पाटील यांचा आपण जाहीर निषेध करीत असल्याचे सांगितले.
संघर्षाशिवाय आरक्षण अशक्य: संजय मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:37 AM