शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत कोल्हापुरात

By admin | Published: September 29, 2016 1:17 AM

प्रारूप रचनेबाबतही उत्सुकता : पंचायत समिती सोडत तालुका पातळीवर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत ही कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ५ आॅक्टोबरला निघणार असून याच दिवशी पंचायत समितीचीही आरक्षण सोडत तालुका पातळीवर काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २७) याबाबतची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे आरक्षण आणि प्रारूप रचना या दोन्हींबाबतची इच्छुकांची उत्सुकता वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यासाठीची अनुसूचित जातीजमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला राखीव जागा या जागांसाठीची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ताराराणी सभागृहात दुपारी तीन वाजता होणार आहे. तसेच पंचायत समितीसाठीची आरक्षण सोडत त्या-त्या तालुका पातळीवर सकाळी ११ वाजता पंचायत समिती, नगरपालिका सभागृह, महसूल भवन अशा सोयीच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे. याबाबतचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शाहूवाडी येथे पंचायत समिती सभागृहात, पन्हाळा येथे मयूर बागेतील सांस्कृतिक सभागृहामध्ये, हातकणंगले व शिरोळ येथील सोडत महसूल भवनमध्ये, कागलची सोडत तहसीलदार कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहामध्ये, करवीरची सोडत पंचायत समितीच्या सभागृहामध्ये, गगनबावड्याची सोडत नवीन प्रशासकीय भवन, तहसीलदार कार्यालय येथे, राधानगरीची सोडत तहसीलदार कार्यालय येथे, भुदरगडची सोडत नवीन प्रशासकीय इमारत, पंचायत समिती येथे, आजऱ्याची सोडत तहसीलदार कार्यालयात, गडहिंग्लजची सोडत नगरपरिषदेच्या सभागृहात व चंदगडची सोडत पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे.