संतोष पाटील ल्ल कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी बँका व राष्टÑीय बँकांत तब्बल ३०० कोटी रुपये ठेवीदार न आल्याने बेवारसरित्या पडून आहेत. देशभरातील अशा पडून असलेल्या कॉर्प्स फंडाची रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)कडून गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ही बेवारस रक्कम आरबीआयच्या फंडात जमा होणार आहे. अशाप्रकारच्या ठेवी अवैध मार्गाने ठेवलेल्या असल्याने याबाबत दावेदार पुढे येण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यातील डझनभर सहकारी बँकांनी गेल्या काही वर्षांत कार्यभार गुंडाळला. काही बँकांवर अवसायक आले, तर काही बँका दुसर्या बँकेत विलीन झाल्या. अशा बुडालेल्या बँकांत बेवारस ठरलेली रक्कम १०० कोटींच्या घरात आहे तर जिल्ह्यातील राष्टÑीय, खासगी व सहकारी अशा ८६ बॅँक ांच्या ५३६ शाखांत २०० कोटींहून अधिकची रक्कम बेवारसरित्या आहे. ‘आरबीआय’च्या नव्या धोरणानुसार ही सर्व रक्कम नव्या फंडात जमा केली जाणार आहे. ‘इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ने २००७ पूर्वी अवसायनात गेलेल्या बँकांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी ३१ मार्च २०१३ दाव्यांचे सादरीकरण करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, या बुडालेल्या बँकेत अनेक ग्राहकांनी बोगस खाती उघडून रक्कम मुरविल्याचा संशय आहे. काही खातेदारांकडे ठेवींचे पुरावे नाहीत, तर अनेक खातेदार ठेवीचा कोणताही पुरावा मागे न ठेवता मृत झाले आहेत. अशा ठेवीदारांच्या रकमेबाबत ठोस पुरावा ना बँकेकडे आहे, ना ‘त्या’ ठेवीदारांकडे; यामुळे परताव्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
बँकांतील बेवारस ३०० कोटी रिझर्व्ह फंडात रिझर्व्ह बँकेचा विशेष फंड : वारसदाराने पुरावे सादर करताच व्याजासह परतावा
By admin | Published: May 10, 2014 12:20 AM