गडहिंग्लज : गोकुळ दूध संघाच्या मतदानानंतर व्हेंटिलेटरवरील कोरोनाबाधित ठरावधारक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजीरा तथा दादा ईश्वर मोहिते( वय ७२, रा.अत्याळ, ता.गडहिंग्लज )यांचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे निवडणूकीत झालेल्या त्यांच्या मतदानाविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे.मोहिते हे अत्याळ येथील विठ्ठल सहकारी दूध संस्थेचे विद्यमान संचालक होते.त्यांच्या नावावर गोकुळचा ठराव होता.दरम्यान,कोरोनाच्या संसर्गामुळे आठ दिवसांपासून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वासोश्वासाला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.रविवारी, येथील एम.आर.हायस्कूलवर 'गोकुळ'साठी मतदान झाले. दुपारी ४ नंतर कोरोना बाधितांना पीपीई किट परिधान करून मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.त्यानुसार कोरोनाबाधित ५ ठरावधारकांनी मतदान केले. दरम्यान, मतदानानंतर रात्री उशिरा मोहिते यांचा मृत्यू झाला.त्यांनीगडहिंग्लज शहर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष,शिवाजी बँकेचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष, तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, मुलगी,सूना-नातवंडे,३भाऊ व बहिण असा परिवार आहे.व्हेंटिलेटरवर असतानाही मतदान.. ?व्हेंटिलेटरवर असतानाही मोहिते यांनी मतदान कसे केले ? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रकांत खोत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,मोहिते हे व्हेंटिलेटरवर होते, सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले आहे.
'गोकुळ'च्या मतदानानंतर ठरावधारकाचा मृत्यु..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 10:20 AM
GokulMilk Election Kolhapur : गोकुळ दूध संघाच्या मतदानानंतर व्हेंटिलेटरवरील कोरोनाबाधित ठरावधारक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजीरा तथा दादा ईश्वर मोहिते( वय ७२, रा.अत्याळ, ता.गडहिंग्लज )यांचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे निवडणूकीत झालेल्या त्यांच्या मतदानाविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
ठळक मुद्दे'गोकुळ'च्या मतदानानंतर ठरावधारकाचा मृत्यु..! कोरोनाबाधीत मतदार : मतदानाविषयी उलटसुलट चर्चा