शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

नेत्यांच्या शब्दाचा मान राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 12:50 AM

हसन मुश्रीफ : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीसाठी कोल्हापुरात बैठक

गडहिंग्लज : विधानसभेला कुणी मदत केली, कोण विरोधात गेले हा नंतरच प्रश्न आहे. मात्र, विधानसभा निवडणुका आणि गडहिंग्लज कारखाना चालवायला देताना आगामी राजकारणात एकत्र काम करण्याचा शब्द प्रकाश चव्हाण यांना दिला आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच आघाडी होईल. कार्यकर्त्यांनी नेत्यांनी दिलेल्या शब्दाचा मान राखावा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आयोजित राष्ट्रवादी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यापक आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राष्ट्रवादी पक्षाचे पॅनेल म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुश्रीफ म्हणाले, दौलत बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार यांचे सुरू असलेले हाल आणि व्यथा चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी पहायला मिळाल्या. तशी अवस्था गडहिंग्लजकरांची होऊ नये, म्हणूनच कारखाना चालवायला देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. आमदार कुपेकर म्हणाल्या, कार्यकर्त्यांच्या भावनेशी व मतांशी आपण सहमत आहोत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. बी. एन. पाटील, उदय जोशी, शिवप्रसाद तेली व जयकुमार मुन्नोळी, दीपक जाधव, शिवाजी खोत, सतीश पाटील, सदानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ताकद व क्षमता लक्षात घेऊनच आघाडीतील जागा वाटप व्हावे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळावा अशी सूचना जयसिंग चव्हाण व अमर चव्हाण यांनी केली. यावेळी रामाप्पा करिगार, उपसभापती तानाजी कांबळे, जितेंद्र शिंदे, रघुनाथ पाटील, टी. एल. धुमाळ, इकबाल काझी, आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. अविश्वास ठरावाशी संबंध नाही गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याविरुद्ध त्यांच्याच सहकाऱ्यांनी अविश्वास ठराव आणला होता, तो त्यांच्यातील अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. त्याच्याशी आपला काडीमात्र संबंध नाही. मात्र, त्यानंतर कारखाना चालविण्यासाठी मदतीची विनंती केल्यामुळेच चव्हाण यांना मदत केली, असेही मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)