कोल्हापूर : समाजातील महिला ह्या आई, पत्नी, बहीण अशा विविध अंगाने भूमिका बजावतात. त्यामुळेच त्या समाजातील मुख्य घटक मानल्या जातात, त्यांचा रोजच सन्मान करावा, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक मा. शा. पाटील यांनी केले.
राजारामपुरीतील विविध तालीम संस्था, तरुण मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून काम केलेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, शिक्षिका, नर्स, अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी यांचा कोल्हापुरी फेटे, शाल, श्रीफळ, कृतज्ञता पत्र देऊन पोलीस उपअधीक्षक पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सहा. पो. नि. दीपिका औदाळ ह्या प्रमुख उपस्थित होत्या.
कार्यक्रमात डॉ. केतकी पवार, डॉ. चैत्राली चौगले, शिक्षिका सारिका पाटील, नर्स प्रतिमा पलंगे, अंगणवाडी सेविका शीतल पोवार, रोहिणी शेळके, उर्वी वूमन्स क्लबच्या सारिका पाटील, महिला पोलीस सर्वश्री नंदा सुतार, अरुणा कांबळे, सुप्रिया कचरे, अमृता चव्हाण, प्रतिमा पेटकर, वर्षा पाटील या महिलांना सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास माजी महापौर दीपक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिणचे अध्यक्ष नितीन पाटील, पीटर चौधरी, अनिल घाटगे, रवींद्र मोरे, संजय काटकर, काका पाटील, निरंजन कदम, सुरेंद्र माने तसेच महिलांची उपस्थिती होती.
फोटो नं. १४०३२०२१-कोल-सत्कार
ओळ : राजारामपुरी परिसरातील विविध तालीम संस्थांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक मा. शा. पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा महिलांचा सत्कार करण्यात आला.