कोल्हापूर : करवीरनगरीतील परिपूर्ण कुटुंबासाठीचा सर्वांत मोठा खरेदी उत्सव ‘लोकमत शॉपिंग उत्सव-२०१६’ कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात गुरुवारी सुरू झाला. दिवसभर नागरिकांनी खरेदीसह लज्जतदार खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. शहरवासीयांसाठी राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात रविवार (दि. १०) पर्यंत हा उत्सव रंगणार आहे. प्रदर्शनामध्ये खरेदी करणाऱ्यांना हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.कोल्हापूरकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या ‘लोकमत शॉपिंग उत्सव-२०१६’चे सायंकाळी पाच वाजता करवीर आदर्श महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी वॉव ज्वेल कलेक्शनचे नीलेश झवेरी व धीरज राठोड, हॅपी हाऊसचे राजेश कोलार उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रमुख उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शॉपिंग उत्सव सकाळी दहा वाजल्यापासून खुला झाला. सायंकाळी कुटुंबासमवेत, काहीजण मित्र-मैत्रिणींसमवेत येथे आले होते. उत्सवातील फोर व्हिलर, इलेक्ट्रॉनिक्स, किचन अॅप्लायन्सेस, फर्निचर, होम अॅप्लायन्सेस, होम डेकॉर, पर्सनल केअर, फॅशन्स, फूड प्रॉडक्टस्, हेल्थ केअर संबंधित वस्तू व त्यांच्या सेवांच्या माहितीचे स्टॉल लावले आहेत. विविध प्रकारची लोणची, चटणी आणि रोजच्या वापराच्या वस्तूंच्या स्टॉल्सचाही समावेश आहे. काही स्टॉलधारकांनी आकर्षक सवलती दिल्या आहेत. त्याची माहिती घेण्यासह खरेदीही धुमधडाक्यात सुरू झाली. मनसोक्त खरेदीनंतर अख्खा मसूर, रोटी, ढोकळा, कच्छी दाबेली, अशा विविध लज्जतदार पदार्थांचा आबालवृध्दांनी आस्वाद घेतला. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, मधुर संगीताचे सूर आणि भरगच्च स्टॉल अशा वातावरणात उत्सवाला कोल्हापूरकरांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवाचे प्रायोजक ‘वॉव ज्वेल कलेक्शन’ तर, सहप्रायोजक ‘स्लीपवेल’ आहेत. (प्रतिनिधी)सुंदर साडी, उखाणे स्पर्धा आजउत्सवांतर्गत डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात ‘लोकमत’ सखी मंच आणि बालविकास मंचतर्फे विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात सखी मंचतर्फे आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सुंदर साडी व उखाणे स्पर्धा होईल. बालविकास मंचतर्फे शनिवारी (दि. ९) दुपारी साडेचार वाजता ‘माझे आवडते कार्टून’ विषयावर चित्रकला स्पर्धा आणि रविवारी (दि. १०) दुपारी बारा वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे.सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या सुवर्णा यादवशॉपिंग उत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी ‘लोकमत’ने लकी ड्रॉ आयोजित केला आहे. पहिल्या दिवशी काढलेल्या ड्रॉमध्ये चिपडे सराफतर्फे सोन्याच्या नथीच्या मानकरी बालिंगा (ता. करवीर) येथील सुवर्णा यादव ठरल्या.मे. श्री गणेश एंटरप्रायझेसतर्फे दिल्या जाणाऱ्या वॉटर प्युरिफायरच्या विजेत्या प्रिया देसाई आणि स्लिपवेलच्या बेडशीटचे विजेते पी. पी. लाड ठरले. ‘द नीड’च्या आकर्षक भेटवस्तूचे विजेते कैलास माळी, तर दिग्विजय कांबळे, रेखा घबाले, साधना कोकीटकर, छाया विभूते, मंगला सारडा, भारत कांबळे अन्य बक्षिसांचे मानकरी ठरले. या विजेत्यांना आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता उत्सवाच्या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहेत. या स्वरूपातील बक्षिसे लकी ड्रा शॉपिंग उत्सवात रोज दिली जाणार आहेत.
‘लोकमत शॉपिंग उत्सवा’ला प्रतिसाद
By admin | Published: January 08, 2016 12:24 AM