कोल्हापूर : मी पाणी काटकसरीने जपून वापरीन, पाण्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन, असा संकल्प आज, मंगळवारी हजारो नागरिकांनी केला. निमित्त होते समन्यायी पाणी वितरण संकल्पनेचे.वसुंधरा पाणी परिषद, भारतीय जलसंस्कृती मंडळ, टीक नेचर क्लब आणि विविध पर्यावरण, निसर्ग संस्थांतर्फे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विविध ठिकाणी आज सकाळी अकरा वाजता दोन मिनिटे स्तब्ध राहून काटकसरीने पाणी वापरण्याचा संकल्प केला. वर्षातील दिवस आणि रात्र समसमान असलेला दिवस म्हणजे २३ सप्टेंबर होय. या दिवसाचे प्रतीक म्हणून जिल्ह्यात ‘समन्यायी पाणी वितरण’ या संकल्पनेचा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिवसभरात आपल्या सोयीनुसार अनेक नागरिकांनी आपले काम दोन मिनिटे बंद ठेवून तसेच सर्वांना सोयीस्कर अशा ठिकाणी एकत्रित येऊन शुद्ध पाण्याच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात त्याग केलेल्या, कष्ट सहन केलेल्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटे उभे राहून स्तब्धता पाळली आणि त्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याबाबत संकल्प केला. या उपक्रमात अनेक शाळा, जिल्हा परिषदेचे विविध विभाग सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)असा होता संकल्प....मी पाणी काटकसरीने जपून वापरीन. त्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. त्याचे समन्यायी तत्त्वावर वितरण करण्यासाठी आणि सर्वांना पुरेसे पाणी कसे मिळेल, हे पाहण्यासाठी मी सतत जागरूक असेन. मी आवश्यक तेथे झाडे लावण्यास, ती जगविण्यास, सहकार्य आणि श्रमदान करीन. माझ्या गावातील प्रत्येकजण समृद्ध कसा होईल, माझ्या गावात एकही माणूस दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, अशिक्षित असणार नाही, हे मी पाहीन. माझा संपूर्ण गाव आणि देश समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.पाणी काटकसरीने जपून वापरीन, असा संकल्प एक दिवस करून चालणार नाही; तर प्रत्येक नागरिकाने तो वर्र्षभर केला पाहिजे. हा संकल्प स्वत:पुरता मर्यादित न ठेवता सर्वांना दिला पाहिजे. या उपक्रमात जिल्ह्णातील सुमारे पाच हजार नागरिक तरी नक्कीच सहभागी झाले असतील. - प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे अध्यक्ष, भारतीय जल संस्कृती मंडळ असा होता संकल्प....मी पाणी काटकसरीने जपून वापरीन. त्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. त्याचे समन्यायी तत्त्वावर वितरण करण्यासाठी आणि सर्वांना पुरेसे पाणी कसे मिळेल, हे पाहण्यासाठी मी सतत जागरूक असेन. मी आवश्यक तेथे झाडे लावण्यास, ती जगविण्यास, सहकार्य आणि श्रमदान करीन. माझ्या गावातील प्रत्येकजण समृद्ध कसा होईल, माझ्या गावात एकही माणूस दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, अशिक्षित असणार नाही, हे मी पाहीन. माझा संपूर्ण गाव आणि देश समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.
समन्यायी पाणी संकल्पास प्रतिसाद
By admin | Published: September 24, 2014 12:18 AM