शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

कोल्हापूर येथे कृषी प्रदर्शनास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:54 AM

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघ व राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ शुक्रवारी गांधी मैदान येथे झाला. येथे आॅटोमोबाईल, औषधांसह खाद्यपदार्थांचे सुमारे २०० स्टॉल उभारले असून उद्या, रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.खाद्यपदार्थ, कृषिसाहित्य, आॅटोमोबाईल, शेती अवजारे, विविध कीटक व तणनाशक व बचतगटांच्या विविध वस्तूंच्या स्टॉलचा ...

ठळक मुद्देदोनशे स्टॉलचा सहभाग : उद्या सांगता समारंभ, बक्षीस वितरणकागल तालुक्यातील भल्या मोठ्या शिंगांचा बोकड व पाच किलो वजनाचा कोंबडा सर्वांचे आकर्षण परिसरातील लोकांना या प्रदर्शनाबाबत कमालीचे कुतूहल

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघ व राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ शुक्रवारी गांधी मैदान येथे झाला. येथे आॅटोमोबाईल, औषधांसह खाद्यपदार्थांचे सुमारे २०० स्टॉल उभारले असून उद्या, रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

खाद्यपदार्थ, कृषिसाहित्य, आॅटोमोबाईल, शेती अवजारे, विविध कीटक व तणनाशक व बचतगटांच्या विविध वस्तूंच्या स्टॉलचा सहभाग असलेले हे कृषी प्रदर्शन शुक्रवारी सर्वांसाठी खुले झाले. राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व महापौर हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी याचे उद्घाटन करण्यात आले.

प्रदर्शनात शुक्रवारी पहिल्या दिवशी कागल तालुक्यातील भल्या मोठ्या शिंगांचा बोकड व पाच किलो वजनाचा कोंबडा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पहिल्या दिवशी जनावरे, पशुपक्ष्यांची संख्या कमी असली तरी आज, शनिवारपासून नामवंत जनावरे व आकर्षक पशुपक्ष्यांचे स्टॉल वाढणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

रविवारी दुपारी चार वाजता प्रदर्शनाचा सांगता समारंभ व बक्षीस वितरण होणार आहे. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, संचालक विलास साठे, जी. डी. पाटील, परीक्षित पन्हाळकर, आदी उपस्थित होते.गांधी मैदानात पहिलेच कृषी प्रदर्शनगांधी मैदानात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शन होत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना या प्रदर्शनाबाबत कमालीचे कुतूहल आहे. उद्घाटनापूर्वी नागरिकांनी स्टॉल पाहण्यासाठी गर्दी केली होती.कोल्हापुरातील गांधी मैदान येथे शेतकरी संघ व राजारामबापू दूध संघ यांच्या वतीने शुक्रवारपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षित पन्हाळकर, राजेश पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, युवराज पाटील, महापौर हसिना फरास, के. पी. पाटील, आदी उपस्थित होते.