सडोली (खालसा)
ग्रामपंचायत व प्राथमिक उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या वाशी, ता.करवीर येथील कोरोना लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार दिवसांत ५७० जणांनी लसीकरण करून घेतले असून, लसीकरणासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.
वाशी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वाशी, पिरवाडी, नंदवाळ, शेळकेवाडी गावच्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी केंद्राची सुरुवात करण्यात आली. लसीकरणासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, केंद्र सुरू होऊन सात दिवस झाले. त्यातील लसीअभावी तीन दिवस केंद्र बंद ठेवावे लागले. अवघ्या चार दिवसांत ५७० जणांनी लसीकरण करून घेतले असून, लसीकरणासाठी रांगा लावल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मंडप टाकण्यात आला आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच गीता लोहार, उपसरपंच संगीता पाटील, ग्रामसेविका टी. जी. अत्तार, इंद्रजित पाटील, अरुण मोरे, संदीप पाटील, तलाठी एकनाथ शिंदे, नीलेश कुंभार, आरोग्यसेविका रेश्मा वनिरे, आरोग्यसेवक संग्राम रोगे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आशा स्वयंसेविका परिश्रम घेत आहेत.
फोटो ओळ
वाशी, ता.करवीर येथील कोरोना लसीकरण केंद्रावर लोकांचा लसीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लसीकरणासाठी लावलेली रांगा.