मंगळवारी तालुक्यातील घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. कोरोनाचे नियम पाळून साध्या पद्धतीने गणपती बाप्पाचा गजर करीत दुपारनंतर या विसर्जनाला सुरुवात झाली. राशिवडे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार काहिलीमध्ये विसर्जन करून त्या मूर्ती संकलित करून डोंगरांमध्ये खणीत विसर्जित केल्या. त्यासाठी सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच अनिल वाडकर व ग्रामपंचायत कमिटीने परिश्रम घेतले. येळवडे येथेही मूर्ती दानचे आवाहन करण्यात आले होते. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोदवडे येथे गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने मूर्ती नदीत विसर्जित न करता त्या परस्पर डोंगरात विसर्जित करण्याची प्रथा कायम ठेवली आहे. यंदाही गावाबाहेर खड्डा करून त्यात प्लास्टिक पेपर टाकून साठवलेल्या पाण्यात गावाने मूर्ती विसर्जित केल्या. त्या मूर्ती जमा करून विधिवत डोंगरातील खाणींमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यासाठी सरपंच मंगल पाटील, उपसरपंच विष्णुपंत पाटील, ग्रामसेवक श्रीराम कांबळे व कमिटीने परिश्रम घेतले.
राशिवडेत मूर्तिदान उपक्रमास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:29 AM