शासनाने घातलेले कडक निर्बंध मानण्यास येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आठवडाभर सर्व दुकाने प्रशासनाने सांगूनसुद्धा उघडीच होती. वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला यासाठी शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी शहरातून दुकाने उघडली, तर गुन्हे नोंदविण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शनिवारी सकाळी औषध दुकानाव्यतिरिक्त कोणतीच दुकाने उघडली गेली नाहीत.
सहा. पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी बरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता.
फोटो ओळ :- मुरगूड (ता. कागल) येथे वीकेंड लॉकडॉऊनमध्ये उगाचच फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना मुरगूड पोलीस कर्मचारी.