शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘लोकमत’च्या हाकेला कडवी खोऱ्याचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 1:24 AM

लोक, संस्था सहभागातून नदी स्वच्छतेचा निर्धार : आराखड्याकरिता कृती समितीची स्थापना-लोकमतचाप्रभाव

आंबा : लोकमतने ‘जीवनवाहिनी कडवीची मरणयातना’ या वृत्तमालिकेतून कडवी नदीची समृध्दी जपण्याची गरज मांडली होती. यास कडवी खोऱ्यातील संवेदनशील भूमिपूत्रांनी प्रतिसाद देत सोमवारी मलकापूर येथील नगरपालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. अडीच तास चाललेल्या या बैठकीत नदीच्या पुनर्जीवनाला योगदान देण्याचा निर्धार करण्यात आला. नगराध्यक्ष अमोल केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत नदीची सद्य:स्थिती व भविष्यातील धोके नजरेसमोर ठेवण्यात आले. यावेळी पंचवीस गावातील शेतकरी, सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते व नगरसेवक यांनी नदीच्या स्वच्छतेबाबत कृतीआराखडा तयार करणारे मुद्दे मांडले. मोनेरा फाउंडेशनचे संस्थापक अजिंक्य बेर्डे व एम. आर. पाटील यांनी नदीचे महत्त्व व अभियानाची भूमिका मांडली.भाजपचे राज्य सदस्य प्रवीण प्रभावळेकर म्हणाले, स्वच्छता अभियानात सरकारीस्तरावर निधी उपलब्ध करून प्रदूषण रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन व तरूण मंडळांच्या माध्यमातून जागृती केली जाईल. शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरजही त्यांनी मांडली. नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांची यादी तयार करून स्वच्छता, प्रदूषण, याअनुषंगाने स्थानिक स्तरावर जावून आठवड्यात आराखडा बनवण्याचे धोरण मांडले. करूंगळे येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एन. बी. पाटील म्हणाले, करूंगळे परिसरात नदी, शिवार यातला फरक दिसत नाही. पावसाळ्यात शिवार पाण्याने भरलेले असते. दीड दशकापूर्वी पात्रात अढी काढून पाणी मिळवत होतो. आता धरणामुळे पाणी सहज उपलब्ध झाले आहे. मात्र, नदीच्या सुधारणांकडे दुर्लक्षच आहे.उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी बॉक्साईट उद्योगातील पन्नासभर मशिन कार्यरत आहेत. त्यांच्या सौजन्यातून दररोज एक याप्रमाणे पन्नास दिवसांत दहा किलोमीटरपर्यंतची नदी स्वच्छता होवून जाईल. त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करीन, असे सांगितले.हुंबवली येथील प्रगत शेतकरी अ‍ॅड.अरविंद कल्याणकर यांनी सोशल मीडियाद्वारे भूमिपूत्रांना संघटित करून स्वच्छता अभियानात सहभागी करून घेण्याचे सुचवले. बांबवड्याचे अमर पाटील यांनी कडवीच्या पाण्याची शुध्दता अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. शेतकरी संघटनेचे गणेश महाजन व विकास देशमाने यांनी कडवीबरोबर शाळी नदीचा स्वच्छता अभियानात समावेश करावा. जल व मृदू संवर्धनाच्या शासकीय योजना राबवण्यास प्रयत्न करता येईल, असे स्पष्ट केले. आळतूरचे माधव कळंत्रे यांनी आळतूर ते निळे या दरम्यानच्या नदीपात्राचे खोलीकरण पाटबंधारे विभागाने केले नाही. त्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी केली. कडवी मध्यम प्रकल्पांतर्गत विकासातून केवळ पाच किलोमीटरपर्यंत नदीचे रूंदीकरण, खोदकाम झाले. पुढील काम थांबले आहे, असे सांगितले. बैठकीप्रसंगी पालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी शाहीद मुल्लाणी यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.स्वागत भाजपचे राज्य सदस्य प्रवीण प्रभावळेकर यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र लाड यांनी केले, एच. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)बैठकीतील मुद्दे असे : नदीची समृध्दी नव्याने जपताना लोकसहभागाचा मोठा वाटा घेतला पाहिजे. स्वच्छतेचे हे काम काटेरी मुकूट आहे. तो सर्वांनी आनंदाने स्वीकारून झपाटून कामाला लागावे, असे प्रभावळकर यांनी स्पष्ट केले. सलग पाच दिवस वृत्तमालिका देऊन याप्रश्नी वाचा फोडल्याबाबत बैठकीत लोकमतच्या अभिनंदनाचा ठराव केला. उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्वच्छता मोहिमेकरिता स्वत:चे फोकलॅड मशिन पाच दिवस मोफत देण्याचे जाहीर केले. या अभियानाच्या जागृतीसाठी मोनेरा फाउंडेशन, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन व एम. आर. पाटील यांचा युवक मंच पुढाकार घेणार आहेत.कडवी आईच्या दूधाचे कर्ज तिला समृद्द करून फेडूया, अशी भावना निळ्याचे प्रयोगशिल शेतकरी अशोक कुंभार यांनी व्यक्त केली. स्वच्छता अभियान नियोजनात सहभागी कार्यकर्ते : विश्वास पाटील (सह्याद्री विकास संस्था, आंबा) गणेश पाटील (केर्ले), संदीप पाटील (चांदोली माजी उपसरपंच), अरविंद कल्याणकर (हुंबवली), भास्कर कांबळे (ग्रा. पं. सदस्य घोळसवडे), रमेश कांबळे, इब्राहिम पन्हाळकर (धाऊडवाडा), शिराज शेख (शिवराजे मंडळ, लव्हाळा), सीताराम पाटील (धोपेश्वर देवस्थान समिती, जावली), संजय कांबळे (वारूळ), अमोल सुतार (वारूळ), एस. टी. पाटील (शिरगाव), नंदकुमार कोठावळे (वैश्य समाज सचिव, मलकापूर), मानसिंग कांबळे (नगरसेवक), एच. एस. पाटील (शाहूवाडी), विनायक हिरवे (शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ), डी. आर. गुरव (पर्यवेक्षक, पाटबंधारे करंजोशी).जागृती समिती व आर्थिक नियोजन समितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या कृती समितीची नियोजन बैठकीत स्थापना झाली. सदस्य असे : प्रवीण प्रभावळेकर, अमोल केसरकर, दिलीप पाटील, राजेंद्र लाड, एन. बी. पाटील, गणेश महाजन, मिलिंद सबनिस, भास्कर कांबळे, शिराज शेख.