हेरले: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर हेरले व परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बंद करण्यात आल्या.
हेरले, मौजे वडगाव, माले, मालेवाडी, चोकाक व मुडशिंगी परिसरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा रात्री ८ वाजल्यापासून बंद करण्यात आल्या. यावेळी कोल्हापूर- सांगली राज्य महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू होती. तसेच हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. तर लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नका, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना नियंत्रण समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.