शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

कामगार भरतीत कंत्राटी कामगारांना कायम करा - राजू शेट्टी

By संदीप आडनाईक | Published: March 05, 2024 7:54 PM

महावितरणमध्ये शासनाकडून नवीन कामगार भरती केली जात आहे.

कोल्हापूर: महावितरणमध्ये शासनाकडून नवीन कामगार भरती केली जात आहे. त्यात उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस स्वत:चा जीव धोक्यात घालून गेल्या १५ ते २० वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्यांना कायम करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. कोल्हापूरातील महावितरणच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली, त्यावेळी झालेल्या द्वारसभेत ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीतर्फे कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. यावेळी नेत्यांनी द्वारसभा घेतली. वीज मंडळाच्या तिन्ही कंपन्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे, नवीन नोकर भरती प्रक्रिया राबवू नये, सध्या मिळत असलेल्या एकुण पगार, भत्ता यासंदर्भात १ एप्रिल २०२३ पासून मागील सर्व फरकांसह ३० टक्के वेतन वाढ करावी, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावेत, तसे आदेश संबंधित कंपन्यांना कळवावेत, रानडे समितीच्या शिफारशींनुसार भरतीसाठीची वयोमर्यादा समान असावी, कंत्राटी कामगारांना सामाउन घेताना वयोमर्यादेत सवलत द्यावी, कंत्राटदार हटवून शासनाचे २३ टक्के पैसे वाचवावेत, अपघात विमा, सेवानिवृत्तीची ग्रॅच्युअटीचा लाभ देण्यासह इतर मागण्या संघटनेने केल्या आहेत.

भरतीच्या नावे वीज वितरण कर्मचाऱ्यांचे शोषणराज्यामध्ये महावितरण विभागामध्ये भ्रष्ट कारभार सुरु असून नवीन निर्माण झालेल्या बांडगुळी व्यवस्थेमुळे कंत्राटी भरतीच्या नावाखाली वीज वितरण कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. प्रशासकीय पातळीवर मंत्रालयापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून कंत्राटी कामगारापेक्षा कंपन्यांचेच भले होत आहे, कंत्राटी कंपन्या आणि सरकारमधील बड्या लोकांचे अर्थपूर्ण हितसंबंध असून संगनमताने कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते, असे राजू शेट्टी म्हणाले. राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्या या योग्य असून याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेतले पाहिजे, त्यांना अपघात विमा, सेवानिवृत्तीपोटी ग्रॅच्युयटी यासारख्या गोष्टींचा लाभ मिळाला पाहिजे, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी